Yuvasena-Sharmila Yewale | पुण्यातील युवासेनेत खदखद कायम; सहसचिव शर्मिला येवले यांच्या पदाला स्थगिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Yuvasena-Sharmila Yewale | साधारणपणे ५ महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड केला. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आणि अनेक आमदार तसेच खासदार उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंबरोबर गेले. पण, ही उभी फूट तिथपर्यंत थांबली नाही आणि आजही अनेक नेते उद्धव ठाकरे गटाला सोडून एकनाथ शिंदेंचा हात धरत आहेत. याचा तसा जास्त परिणाम युवासेनेवर झाला नाही. पण गेल्या काही दिवसांपासून युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खदखद पाहायला मिळत आहे. विशेषत: पुण्यातील युवासेनेत मोठा असंतोष आहे. (Yuvasena-Sharmila Yewale)

 

त्यानंतर युवासेनेच्या सहसचिव शर्मिला येवले यांनी युवासेनेच्या पदाचा राजीनामा दिला होता . काही दिवसांपूर्वी पक्षात आपल्याला काम करू दिले जात नसल्याचे सांगत येवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी त्यांची समजूत काढली होती. पण, सामना वृत्तपत्रातून शर्मिला येवले यांच्या पदाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Yuvasena-Sharmila Yewale)

पदावरून दूर करण्यात आल्याने आता शर्मिला येवले या शिंदे गटात जाऊ शकतात, अशी चर्चा आहे. तसे घडल्यास येवले यांच्या राजीनाम्यानंतर पुण्यातील युवासेनेचे आणखी काही पदाधिकारी पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

 

युवासेनेच्या पुण्यातील ३५ महिला पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी सामूहिक राजीनामा देण्याचा प्रयत्न केला होता.
त्यावेळी युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी या सर्व महिला पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांची समजूत काढली होती.
तुम्ही सांगितलेल्या अडचणींवर उपाय काढला जाईल. तुम्ही आपलं काम सुरू ठेवा,
असे सांगून वरुण सरदेसाई यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारण्यास नकार दिला.
पण शर्मिला येवले यांच्या पदाला स्थगिती देण्यात आल्याने युवासेनेतील खदखद कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

 

Web Title :- Yuvasena-Sharmila Yewale | uddhav thackeray camp yuvasena office bearer sharmila yewale resigned in pune maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Raj Thackeray | ‘आपण महापुरुषांना संकुचित दृष्टिकोनातून पाहतो’; महापरिनिर्वाणदिनी राज ठाकरेंचे जनतेला आवाहन

Nashik ACB Trap | 51 हजारांची लाच स्वीकारताना ठेकेदार पोलिसांच्या जाळ्यात; नाशिकमधील प्रकार

U-19 Women’s T20 WC | शफाली वर्माची Under 19 विश्वचषकासाठी महिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती

Aurangabad ACB Tap | लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात