संपर्कप्रमुखपदी युवराज डुबे यांची निवड

कदम-वाकवस्ती : पोलीसनामा ऑनसाइन – धनगर समाज सेवा संस्था नोकरी पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी युवराज डुबे यांची निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष नवनाथ ढगे पश्चिम महाराष्ट्र नामदेव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र कार्याध्यक्ष दत्तात्रय चोरमले यांच्या हस्ते डुबे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

प्रसंगी हवेली तालुका संघटक संजय काळे, प्रशांत थोरात, अभिजीत राऊत, हेमंत कोळपे, वसंत केसकर उपस्थित होते. दरम्यान, डुबे म्हणाले की, संघटनेमार्फत धनगर समाजातील युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न असणार आहे. समाजाने दिलेल्या जबाबदारी ची जाणीव ठेवून योग्यप्रकारे काम करू असा विश्वासही त्यांनी दिला.