गौप्यस्फोट ! ‘असं’ होणार हे माहित होतं, निवृत्‍तीनंतर 4 महिन्यांनी युवराज सिंह बोलला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा माजी फलंदाज युवराज सिंह याने जून महिन्यात क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. मात्र आता निवृत्तीच्या चार महिन्यानंतर त्याने आपल्या निवृत्तीवर भाष्य केले आहे. तसेच आपल्याला निवृत्ती का स्वीकारावी लागली हे देखील स्पष्ट केले. निवृत्तीविषयी बोलताना तो म्हणाला कि, माझ्यासमोर अनेक पर्याय ठेवण्यात आले. त्यावेळी त्याच्याबरोबर कुणीही नव्हते आणि संघाच्या योजनांविषयी देखील त्याला माहिती देण्यात आली नाही.

पहिल्यांदा यो-यो टेस्ट आणि नंतर स्थानिक क्रिकेटचा बहाणा
याविषयी बोलताना युवराज म्हणाला कि, 8 ते 9 सामन्यांत 2 वेळा सामनावीराचा ‘किताब मिळाल्यानंतर मला संघातून बाहेर केले जाईल असा विचार मी कधीही केला नव्हता. त्यानंतर श्रीलंका दौऱ्यासाठी मला तयार राहण्यास सांगण्यात आले. मात्र त्यानंतर यो-यो टेस्ट समोर आली आणि वयाच्या ३६ व्या वर्षी मला त्याची तयारी करावी लागली.

मी हि चाचणी पास केल्यानंतर मला घरगुती क्रिकेट खेळण्यास सांगण्यात आले. त्यामुळे यो-यो टेस्ट फेल झाल्यानंतर मला संघाबाहेर करण्यासाठी त्यांना कारण मिळाले असते. मात्र मी ती क्लिअर केल्यानंतर मला काढण्यासाठी त्यांना काहीतरी बहाणा हवा होता, असेदेखील युवराजने स्पष्ट केले. त्यानंतर जूनमध्ये युवराजने निवृत्तीची घोषणा केली.

काय होत नाही भारतीय संघात ?
युवराजने सांगितले कि, अंतिम दिवसांमध्ये वरिष्ठ खेळाडूंना विश्वासात घेतले जात नाही. प्रत्येक खेळाडूला त्याच्या भविष्याविषयी सांगायला हवे. आणि हेच नेमके भारतीय क्रिकेटमध्ये होत नसल्याचे त्याने सांगितले.

रोहित शर्मावर भाष्य
याविषयी बोलताना युवराज म्हणाला कि, रोहित शर्मा याला आधीच सलामीला खेळण्याची संधी द्यायला हवी होती. त्याला खूप उशिरा सलामीला खेळण्याची संधी मिळाली.