‘सिक्सर किंग’ युवराज करणार ‘हे’ काम , बीसीसीआयकडे मागितली मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा माजी फलंदाज युवराज सिंह याने काही दिवसांपूर्वी आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. १९ वर्षाच्या दीर्घ कारकिर्दीत त्याने भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली. २००७ मधील ट्वेन्टी-२० वर्ल्डकप असेल किंवा २०११ मधील एकदिवसीय वर्ल्डकप या दोन्ही स्पर्धा भारताने जिंकण्याचे मोठे श्रेय युवराज सिंह याला जाते.

आता निवृत्तीनंतर युवराज सिंह नवीन काम करणार आहे. यासाठी त्याने नुकतीच बीसीसीआयला पत्र लिहून यासाठी परवानगी मागितली आहे. जगभरातील ट्वेन्टी-२० स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी युवराजने बीसीसीआयकडे परवानगी मागितली आहे. कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सक्रिय असलेला खेळाडू विदेशी स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकत नसल्याचे बीसीसीसीआयच्या नियमात आहे, त्यामुळे विदेशी लीगमध्ये खेळात येण्यासाठीच युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर याआधी वीरेंद्र सेहवाग आणि जहीर खान यांनी देखील यूएईमध्ये खेळवण्यात आलेल्या टी-१० लीगमध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे युवराज सिंह याला देखील परवानगी द्यायला बीसीसीआयला काही अडचण नसल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी निवृत्ती स्वीकारताना युवराजने म्हटले होते कि, मी आता जगभरातील ट्वेन्टी-२० स्पर्धांमध्ये खेळू इच्छितो. मनोरंजनासाठी या वयात मी या स्पर्धांत खेळू इच्छित असल्याचे त्याने म्हटले होते. त्यामुळे आता बीसीसीआय त्याला यासाठी परवानगी देते कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘ध्यान’धारणा केल्याने ‘हे’ आजार होतात बरे

‘लैंगिक’ क्षमता जागृत करण्यासाठी योगासनांची ‘विशेष’ भूमिका

नियमीत योगा केल्याने ‘हे’ फायदे, जाणून घ्या

दीर्घायुष्यासाठी ‘हे’ आसन करा

स्मरणशक्‍ती वाढविण्यासाठी आणि व्यसन सोडवण्यासाठी ‘हे’ आसन कराच

‘सर्वांगासन’ केल्याने मिळते मनःशांती

महिलांसाठी ‘योग’साधना अतिशय महत्वाची

तुम्हाला तुमची ‘उंची’ वाढवायचीय, मग फक्‍त ‘हे’ असान कराच