home page top 1

Video : ‘सिक्सर किंग’ युवराज सिंहचा सुपर ‘बॉटल कॅप चॅलेंज’ ; सचिन, लारा आणि गेलला आव्हान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर सध्या एका अनोखे बॉटल कॅप चॅलेंज ट्रेंडमध्ये आहे. खूप जण या प्रकारचे व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. या प्रकारात तुम्हाला बाटलीचे झाकण उघडून दाखवायचे आहेत. बॉलीवुडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी या प्रकारचे व्हिडीओ बनवून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत. यामध्ये आता भारताचा माजी फलंदाज युवराज सिंग याचीदेखील भर पडली आहे. नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या युवराजने अनोख्या पद्धतीने हे चॅलेंज केले आहे.

या चॅलेंजचा त्याने एक व्हिडीओ पोस्ट आहे. यामध्ये त्याने डाव्या हाताने हे चॅलेंज पूर्ण करण्याचे आव्हान दिले आहे. युवराज सिंग या व्हिडिओत बॅटिंग करून त्या बाटलीचे झाकण उघडण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. यात तो बॅटने चेंडू मारून बाटलीवरील झाकण खाली पाडतो. त्याचबरोबर हा व्हिडीओ पोस्ट करताना त्याने सचिन तेंदुलकर, ब्रायन लारा, शिखर धवन आणि ख्रिस गेल यांना हे चॅलेंज पूर्ण करण्याचे आव्हान दिले आहे. त्यामुळे आता ते चॅलेंज पूर्ण करतात कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर युवराज आता विविध देशांतील लीगमध्ये खेळणार आहे.

आरोग्यविषयक बातम्या

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई

Loading...
You might also like