Yuvraj Singh | वादग्रस्त चॅटमुळे माजी क्रिकेटपटू युवराज सिंग ‘गोत्यात’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – Yuvraj Singh | भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू (indian all rounder) युवराज सिंगला (Yuvraj Singh) आपल्या सहकाऱ्याबद्दल अपशब्द वापरणे चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील हांसी येथे शनिवारी युवराजला अटक करण्यात आली. दरम्यान त्याची जामिनावर सुटका झाली आहे. मात्र, तक्रारदार वकील आणि सामाजिक कार्यकर्ते रजत कलसन (Rajat Kalsan) हे या अंतरिम जामिनाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात (supreme court) आव्हान देणार आहेत.

गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. अनेक खेळाडू आपल्या सहकारी खेळाडूंबरोबर इंस्टाग्राम लाईव्हवर (Instagram Live) बोलत होते. युवराजही त्यामध्ये सहभागी झाला होता. टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) अशाच एका लाईव्ह चॅट दरम्यान युवराजने भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलबद्दल (yuzvendra chahal) एक शब्द वापरला होता. त्याने चहलला भंगी असं संबोधले होते. ये भंगी लोगो का काम नही है, ये युझी और इसको ( कुलदीप) असे युवी रोहितला म्हणाला होता.

त्याची हि टिप्पणी दलित समाजाला अपमान करणारी असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच सोशल मीडियावरही त्याला नाराजीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर युवराजने याप्रकरणी माफीही मागितली होती. या वक्तव्यानंतर युवराजविरोधात (Yuvraj Singh) सोशल मीडियावर (Social Media) मोहीम सुरू झाली. दुसरीकडे हंसी येथील वकील रजत कलसन यांनीही युवराज विरोधात तक्रार दाखल केली होती. एससी-एसटी कायद्याच्या कलमांखाली युवराजविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. त्यानंतर हे वकील वर्षापासून युवराजच्या अटकेची मागणी करत होते.

अटक अन् सुटकादेखील

हांसी येथे शनिवारी युवराजला अटक करण्यात आली.
त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर हायकोर्टाच्या आदेशानंतर औपचारिक जामिनावर त्याला सोडण्यात आले.
याच प्रकरणात हायकोर्टाने काही दिवसांपूर्वी युवराजला जामिन दिला होता.
कोर्टाच्या या निकालावर तक्रारदार वकील आणि सामाजिक कार्यकर्ते रजत कलसन (social worker rajat kalsan) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हे देखील वाचा

EPFO | पीएफ कर्मचार्‍यांसाठी लवकरच खुशखबर ! अकाऊंटमध्ये येणार मोठी रक्कम, जाणून घ्या

Pune News | दीपावलीच्या पार्श्वभूमीवर भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे आदेश

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Yuvraj Singh | casteist remarks on yuzvendra chahal yuvraj singh arrested released on bail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update