क्रिकेट मधील निवृत्तीनंतर युवराज नवीन ‘इनींग’साठी सज्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकांना आपल्याकडे खेचून घेण्याची क्षमता ज्याच्याकडे होती. असा क्रिकेट विश्वात माहोल तयार करणारा युवराज सिंह याने नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो मैदानावर खेळताना दिसणार नाही. हे कटू सत्य पचवणं त्याच्या चाहत्यांना खूप अवघड जाणार आहे. परंतु आता तो जरी मैदानावर खेळाला नाही. तरी त्याच्या नवीन इनींगसाठी तो सज्ज झाला आहे. तो आता त्याच्या चाहत्यांना छोट्या पडद्यावर दिसणार असल्याची चर्चा केली जात आहे.

युवराजने काल सोमवार रोजी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली. त्यावेळी अनेक लोकांना वाईट वाटले. कारण क्रिकेट सुरु असताना जेव्हा युवराजची फलंदाजी सुरु असायची तेव्हा असे काही दुर्मिळ लोक असतील कि त्यांच्या नजरा टीव्ही कडे नसतील. कारण युवराज हा भारताला गवसलेला पाहीला लेफ्टी खेळाडू होता. असे म्हंटले तरी वागावे ठरणार नाही. त्याने त्याच्या उत्तम फलंदाजीमुळे अनेक लोकांची मने जिंकून घेतली.

तो आता त्याच्या नवीन इनींगला लवकरच सुरुवात करणार असल्याची चर्चा सुरु असून आताच आलेल्या माहितीनुसार युवराज क्रिकेट नंतर आता खतरोंके के खिलाडी १० मध्ये दिसेल असं बोललं जात आहे. परंतु यावर युवराजने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण सोमवारी पत्रकारांशी बोलताना तो म्हणाला कि, माझा खूप वेळ मी क्रिकेट ला दिला. आता मी समाजसेवा करण्यावर भर देणार आहे. त्यात मी कॅन्सरच्या रुग्णांना पण मदत करणार आहे. कारण तो स्वतः कॅन्सर सारख्या मोठ्या आजरातून गेला आहे.

निवृत्तीनंतर त्याला अनेकांनी त्याच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आणि मी आता माझ्या पुढील इंनिगला सुरुवात करणार असल्याचे त्याने म्हटले आहे. आता तो क्रिकेट नंतर पुढच्या भविष्याची सुरुवात कुठून करतोय हे पाहणे महत्वाचे आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

धक्कादायक ! प्रदूषणामुळे भारतात लाखो मुलांना गमवावा लागतो जीव

डासांचा प्रादुर्भाव, मलेरिया रोखण्यासाठी ‘कोळी’च्या विषाचा उपाय

राग काढण्यासाठी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर ‘पंचिंग’ बॅग

गर्भवती, स्तनदा मातांना लोकलमध्ये मिळू शकते राखीव जागा