हेजल कीचच्या ‘पोस्ट’ वर युवराज सिंगच्या एक्स गर्लफ्रेंडने केली ‘अशी’ कमेंट…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – क्रिकेटपटू युवराज सिंगने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीची घोषणा झाल्यानंतर हेजल कीचने युवराजसाठी एक पोस्ट लिहिली हेजलने प्रेस कॉन्फरन्सच्या वेळी युवराजचा एक फोटो शेयर केला. या पोस्टला युवराजच्या एक्स गर्लफ्रेंडने रिप्लाय केला आहे. ही गर्लफ्रेंड दुसरी कोणीनसुन किम शर्मा आहे.

हेजलने पोस्ट मध्ये लिहिले की, ‘या सोबतच एका युगाचा अंत झाला आहे. स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे. पुढच्या वाटचालीस सुरवात करावी. खूप सारे प्रेम’. यानंतर किमने पोस्टला कमेंट करत लिहिले की, ‘ तुमच्या दोघांची जोडी अशीच नेहमी चमकत राहो’ किमच्या कमेंटला बघून सगळे जण आश्चर्यचकित झाले आहेत. किम आणि युवराज ४ वर्ष सोबत होते. २००७ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. युवराज सिंगची आई शबनम सिंगला किम आवडत नव्हती. युवराजने आईची गोष्ट ऐकली आणि किमला सोडले.

किमच्या व्यतिरिक्त युवराज सिंगचे नाव दीपिका पादुकोन, प्रीती जिंटा आणि रिया सेन सोबत जोडले जात होते. हेजल आणि युवराजच्या लव्ह स्टोरी बद्दल सांगायचे गेले तर, एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘संवादानंतरही मला हे जाणवले नाही की युवराजला मी आवडते . हे मला तेंव्हा कळाले जेंव्हा युवराजने मला प्रपोज केले. मग त्या नंतर, मी युवराजचे प्रपोज स्वीकारले. त्यांनी ३० नोव्हेंबर २०१६ मध्ये लग्न केले.

युवराजने सोमवारी पत्नी हेजल कीच आणि आई सोबत एका कॉन्फरन्स मध्ये निवृत्ती घेतल्याची घोषणा केली. या वेळी युवराज भावुक झाला होता. पत्नी आणि आईने त्यावेळी त्याला आधार दिला. या प्रेस कॉन्फरन्स मध्ये युवराज सिंग म्हणाला, सेवानिवृत्ती घेण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. युवराजने सांगितले की, मी या खेळसाठी माझे रक्त आटवले आहे आणि घाम देखील गाळला आहे परंतु आता माझे प्राधान्य कर्करोगाच्या रुग्णांना मदत करणे आहे.
आरोग्य विषयक वृत्त –

लठ्ठपणामुळे होऊ शकतात ‘हे’ १० गंभीर आजार

हे दोन पदार्थ टाळा ; अन्यथा ‘स्नायू’ होतील कमजोर

यामुळेही वाढू शकतो ‘टाइप-२ डायबिटीस’चा धोका

पोटाचा अल्सर असल्यास आढळतात ‘ही’ १० लक्षणे

Loading...
You might also like