ICC World Cup 2019 : अंबाती रायडूच्या प्रकरणावरून ‘सिक्सर किंग’ युवराजने काढली ‘खुन्नस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. फक्त भारतीय संघातील खेळाडूंवरच टीका होत नाही तर भारतीय संघ व्यवस्थापन आणि सपोर्ट स्टाफवर देखील मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यानंतर आता भारताचा माजी फलंदाज युवराज सिंग याने देखील यामध्ये उडी घेतली आहे. अंबाती रायडू याचा समावेश न केल्याबद्दल त्यांनी संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षकांवर देखील टीका केली आहे. अंबाती रायडू याला संघातून काढून त्याच्याबरोबर चूकीचे वागल्याचे देखील तो म्हणाला.

चौथ्या क्रमांकाचा सक्षम पर्याय

२०१९ च्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघ निवडताना रायडू हा सर्वात सक्षम पर्याय निवड समितीसमोर होता. मात्र त्यांनी त्याचा समावेश न करता त्याला राखीव खेळाडू म्हणून ठेवले. मात्र त्यानंतर शिखर धवन आणि विजय शंकरच्या दुखापतीनंतर देखील त्याचा संघात समावेश केला नाही.

विराटची पहिली पसंद होता रायडू

याविषयी अधिक बोलताना युवराज म्हणाला कि, या क्रमांकासाठी रायडू हा विराट कोहलीची पहिली पसंद होता, मात्र त्याला संधी देण्यात आली नाही. एक दोन सामन्यात कामगिरी खराब झाल्याने त्याला संघात न घेणे मोठी चूक होती. त्याचबरोबर तो म्हणाला कि, रायडूने न्यूझीलंडमध्ये धावा काढल्या होत्या. मात्र त्यानंतर एक दोन सामन्यांत तो अपयशी ठरला म्हणून त्याला संधी न देणे बरोबर नाही. त्याच्यावर मोठा अन्याय करण्यात आल्याचे देखील त्याने म्हटले.

 

आरोग्यविषयक वृत्त

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

 

Loading...
You might also like