क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर युवराज सिंग ठेवणार ‘या’ क्षेत्रात पाऊल ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराज सिंग आता विविध देशांतील टी-२० लीगमध्ये खेळणार असल्याचे समजत आहे. त्यासाठी त्याने बीसीसीआयकडे परवानगी देखील मागितली आहे. त्यानंतर आता नवीन माहिती समोर येत आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराज रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यासाठी त्याला दोन शोची ऑफर आल्याचे देखील समजत आहे. ‘बिग बॉस सीझन १३’ आणि ‘खतरों के खिलाडी या दोन रिअ‍ॅलिटी शोसाठी त्याला विचारणा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अशी माहिती जरी समोर येत असली तरी यासंबंधी युवीकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

याआधी देखील युवराजला या शोसाठी विचारण्यात आले होते, मात्र क्रिकेट खेळत असल्याने त्याने त्यावेळी ऑफर नाकारली होती. मात्र आता क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्याच्याकडे वेळ असल्याने तो या कार्यक्रमांत सहभागी होतो कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भारताला २०११ सालच्या वर्ल्डकपमध्ये मिळालेल्या विजयात मोलाची कामगिरी बजावणारा भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनं १० जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृती जाहीर केली होती.

दरम्यान, युवराज सिंग हा निवृत्तीनंतर देखील तितकीच लोकप्रियता लाभलेला खेळाडू असल्यामुळे त्याच्या या लोकप्रियतेचा फायदा करून घेण्यासाठी कलर्स वाहिनीने त्याला या दोन शोसाठी विचारणा केल्याची चर्चा सध्या रंगत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

मधुमेह, मानसिक आजार आणि हृद्यरोगाला दूर ठेवण्यासाठी करा हे “प्राणायम” 

ह्रदयाची घ्या अशी काळजी , कधीही होणार नाहीत ब्लॉकेजेस …! 

आजपासून योगा करण्याचा संकल्प करणार असाल तर ‘या’ आसनांपासून करा सुरुवात 

गर्भधारने दरम्यान महिलांनी घ्या व्यायामाची अशी ” काळजी ”