‘सिक्सर किंग’ युवीनं शेअर केलं भारतीय खेळाडूंचं Female व्हर्जन !

पोलीसनामा ऑनलाइन – टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर क्रिकेटर युवराज सिंह यानं सोशल मीडियावर टीम इंडियातील क्रिकेटरचा फोटो शेअर केला आहे. युवीनं टीममधील खेळाडूंचं जेंडर स्वॅप करून तो फोटो सोशलवर शेअर केला आहे जो प्रचंड व्हायरल होत आहे.

युवीनं त्याच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे ज्यात सर्व क्रिकेटर मुलीच्या वेशात दिसत आहेत. फोटो शेअर करताना युवी म्हणतो, “यापैकी कोणाला तुम्ही तुमची गर्लफ्रेड म्हणून सिलेक्ट कराल.”

युवराज सिंहची ही पोस्ट सोशलवर खूप व्हायरल होत आहेत. चाहत्यांसोबतच अनेक कलाकारांनीही यावर कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कॅप्शनमधून युवीनं जो सवाल केला आहे त्याला उत्तर देत ऑफ स्पिनर हरभजन सिंह म्हणतो, “यापैकी मी भुवीची (भुवनेश्वर कुमार) निवड करेन.”

इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसन याला तर भारतीय क्रिकेटरांचं फीमेल व्हर्जन पाहिल्यानंतर हसूही आवरता आलं नाही. त्यानं हसतानाची इमोजी वापरत यावर कमेंटही केली आहे.

युएईचा क्रिकेटर चिराग सुरी यानंही कमेंट कर लिहिलं की, “मला वाटतं की, भुवनेश्वर कुमार बेस्ट चॉईस आहे.

आपलं असं फीमेल व्हर्जन पाहिल्यानंतर भुवनेश्वर कुमारही हैराण झाला आहे. त्यानंही स्वत:ची निवड करत सांगितलं मीदेखील भुवीचीच निवड करेन.

जास्त करून तर अनेकांनी भुवनेश्वर कुमारचीच निवड केली आहे. त्याचा लुक त्यांना आवडला आहे. इतकंच नाही तर त्यांनी भुवनेश्वरचं नाव बदलून भुवनेश्वरी केलं आहे.