खुशखबर ! निवृत्तीनंतर ‘सिक्सर किंग’ युवराज सिंग कॅनडानंतर आणखी एका लीगमध्ये करणार फटकेबाजी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा माजी फलंदाज युवराज सिंह याने काही दिवसांपूर्वी आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. १९ वर्षाच्या दीर्घ कारकिर्दीत त्याने भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली. २००७ मधील ट्वेन्टी-२० वर्ल्डकप असेल किंवा २०११ मधील एकदिवसीय वर्ल्डकप या दोन्ही स्पर्धा भारताने जिंकण्याचे मोठे श्रेय युवराज सिंह याला जाते.

आता निवृत्तीनंतर युवराज सिंह नवीन काम करणार आहे. यासाठी त्याने नुकतीच बीसीसीआयला पत्र लिहून यासाठी परवानगी मागितली होती. त्यानंतर आता कॅनडा येथे होणाऱ्या ग्लोबल ट्वेंटी-२० लीगमधील टोरोंटो नॅशनल्स संघाने त्याला करारबद्ध केले आहे. त्यानंतर आता युवराज सिंग आपल्याला २६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या लीगमध्ये युवी २२ सामने खेळणार आहे.

आता तो ग्लोबल ट्वेंटी-20 लीगनंतर युवी युरो ट्वेंटी-२० लीगमध्येही खेळणार असल्याचे समजत आहे. ही लीग आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्स येथे ३० ऑगस्ट व २२ सप्टेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. या लीगविषयी बोलताना ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू डीन जोन्स म्हणाले कि, ‘भारतीय खेळाडू हे आमच्यासाठी मोठं मार्केट मिळवून देणारे आहेत.

युवराज सिंग सारखा खेळाडू या लीगमध्ये खेळल्यास आम्हालाच फायदा होईल. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी भारतीय खेळाडूंना करारबद्ध करण्यात येईल. या लीगचा ड्राफ्ट 19 जुलैला लंडन येथे काढला जाईल,”असे जोन्स यांनी सांगितले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी निवृत्ती स्वीकारताना युवराजने म्हटले होते कि, मी आता जगभरातील ट्वेन्टी-२० स्पर्धांमध्ये खेळू इच्छितो. मनोरंजनासाठी या वयात मी या स्पर्धांत खेळू इच्छित असल्याचे त्याने म्हटले होते. त्याचबरोबर या लीगमध्ये ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन, न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम, अफगाणिस्तानचा रशीद खान आणि पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदीही खेळणार आहे.

शिवाय ख्रिस लीन, बाबर आजम, ल्युक राँची, जेपी ड्यूमिनी यांचाही सहभाग असल्याची घोषणा लवकरच करण्यात येईल. आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्स येथील प्रत्येकी दोन संघ या लीगमध्ये सहभागी होणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

चांगल्या आरोग्यासाठी जीममध्ये जाण्यास वेळ नसेल तर ‘हे’ करा

रोजची कामं करतानाही तुम्ही बर्न करू शकता कॅलरीज

मसाल्याच्या डब्यात जायफळ आवर्जून असूद्यात कारण …

चमकणाऱ्या ‘विजांपासून’ असा करा स्वतःचा बचाव