Video : निवृत्तीनंतर ‘सिक्सर किंग’ युवराज आता करणार ‘जॉब’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराज सिंग आता जॉबसाठी मुलाखती देत आहे. जर तुमचा विश्वास बसत नसेल तर युवराजच्या जॉबसाठीच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे तो पहा. या व्हिडिओमध्ये युवराज नोकरी मिळवण्यासाठी मुलाखतीसाठी आहे, पण मुलाखत घेणारा बॉस न आवडल्यामुळे मुलाखत मधेच सोडून तो निघून गेला असे दिसत आहे.

टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि सिक्सर किंग म्हणून ओळख असणाऱ्या युवराजने हॉट स्टार ची स्पेशल सीरिज ‘द ऑफिस इंडिया’ मध्ये अभिनय केला आहे. या मालिकेमध्ये युवराज एका ऑफिस मध्ये  मुलाखतीसाठी गेला असता त्याची भेट तेथील चड्डा नावाच्या बॉस शी होते. येथे चड्डा साहेब युवराजला अत्यंत मजेदारपणे काही प्रश्न विचारतात. ते सर्वात आधी युवराजला सेल्स एक्सपीरियन्स बद्दल म्हणजे विक्री करण्याच्या कौशल्यासंबंधी विचारतात.

यानंतर युवराजने आपण गाडी, चॉकलेट, टूथपेस्ट, फ्रिज इत्यादी वस्तू तसेच विम्यासारखी सेवादेखील विकल्याचे सांगितले. त्याचबरोबर मी तुम्हाला कागददेखील विकून दाखवू शकतो असेही सांगितले. त्यानंतर या गमतीशीर बॉस ने त्याच्याकडून अनेक वस्तूंवर सह्या करून घेतल्या. याला त्यांनी ‘साइन टेस्ट’ असे म्हटले आहे. त्यानंतर या बॉस ने आणि त्याच्या सहाय्यकाने एक बॉल आणून त्याची ‘थ्रो टेस्ट ‘ देखील घेतली.

युवराज सिंगला आणखी एक मजेदार प्रश्न विचारताना क्रिकेट ला हिंदीत काय म्हणतात असे विचारले गेले. यावर उत्तर देताना युवराजने ‘लंब-दंड-गोल पिंड-भाग-दौड़ प्रतियोगिता.’ असे उत्तर दिले. यानंतर युवराजने पगाराविषयी विचारले असता चड्डा साहेबांनी म्हटले की माझ्यासारख्या बॉस बरोबर काम करण्याची संधी मिळते आहे हेच तुझ्यासाठी खूप आहे. तुला काय पगार देणार, एक वर्षभरासाठी मोफत काम कर. हे ऐकून युवराज चिडून बॉस ला बडबड करत बाहेर निघून जातो.

युवराज सिंग चा हा व्हिडिओ हॉटस्टार वर येत असलेल्या एका नवीन वेब सिरीज चा प्रोमो आहे. युवराज सिंगच्या सहभागामुळे एकंदर या सिरीयल विषयी लोकांची उत्सुकता ताणली गेली आहे. या व्हिडिओला अनेक दर्शकांनी पसंतीदेखील दर्शवली आहे आणि सोशल मीडियावर तो वेगाने व्हायरल होतोय. या शो ची टॅगलाईन देखील ‘५०% चिल्ल ६०%’ अशी मजेदार आणि उत्सुकता वाढवणारी अशी आहे.

आरोग्यविषयक वृत्त – 

‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

रक्तचाचणी द्वारे कळू शकते आयुर्मान आणि भविष्यातील आजार 

या पाच गोष्टींचा आहारा त करा वापर, शरीर होईल निरोगी

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर