आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्‍तीनंतर ‘सिक्सर किंग’ युवराज सिंगचा ‘हा’ आहे ‘फ्यूचर प्लॅन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – १८ वर्षांच्या झंझावाती खेळाने भारताला २००७ टी-२० वर्ल्ड कप आणि २०११ आंतरराष्ट्रीय वर्ल्ड कपमध्ये भारताला जगज्जेता बनविणारा सिंग इज किंग युवराजसिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. युवराजने मुंबईतील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत निवृत्तीची घोषणा केली आहे. निवृत्तीच्या घोषणेनंतर त्याने कॅन्सरग्रस्तांसाठी काम करणार असल्याची घोषणा केली.

काय म्हणाला युवी?
४०० पेक्षा जास्त सामने भारतासाठी खेळल्यानंतर मी निवृत्तीची घोषणा करत आहे. माझ्या आयुष्यातील चढउतारांनंतर मी ही घोषणा करत आहे. भारतासाठी खेळताना टी-२० वर्ल्डकप आणि २०११ चा आय़सीसी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी योगदान देता आले. माझ्या खेळाला सुरुवात झाल्यापासून माझ्या प्रवासात माझ्या संघाने मोठा वाटा दिला आहे. मला कॅन्सरमधून कमबॅक करण्यासाठी धीर देणारे, माझ्या पाठीशी राहणाऱ्या सर्वांचे आभार असे म्हणत माझ्या मते ही निवृत्ती घेण्याची परफेक्ट वेळ आहे. अशा शब्दात त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. मी सौरभ गांगूलीसारख्या दिग्गज खेळाडुच्या नेतृत्वाखाली असलेल्या संघात खेळाला सुरुवात केली. त्यानंतर क्रिकेटमधील माझा आदर्श सचिन तेंडुलकरसोबत खेळायला मिळाले. याचा मला अभिमान आहे.

काय आहे youwecan प्रकल्प ?
युवराज सिंगने कॅन्सरमधून सावरल्यानंतर youwecan संस्था सुरु केली आहे. त्याने निवृत्तीच्या घोषणनेनंतर या संस्थेच्या मदतीने कॅन्सरग्रस्तांसाठी काम करणार असल्याची घोषणा केली. या संस्थेमार्फत युवराज देशभऱात कॅन्सर पिडीतांसाठी कॅम्प सुरु करणार आहे. या कॅम्पच्या माध्यमातून गरीबांसाठी आर्थिक मदत उभी केली जाणार आहे. युवराजने यापुर्वी या संस्थेमार्फत गरीब कुटुंबातील २५ कॅन्सरग्रस्त मुलांच्या उपचाराचा खर्च उचलण्याची घोषणा केली होती.

२-३ वर्षांनंतर कोच म्हणून काम करण्याचा विचार
निवृत्तीनंतर युराजसिंग कोच म्हणून काम करणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. तेव्हा त्याने अद्याप तरी कोच म्हणून काम करणार नसल्याचे सांगितले. २-३ वर्षांनी कोच म्हणून काम करणार असल्याचे सांगितले.

– कॅन्सरशी झुंज देताना हार मानली नाही
युवराजला २०११ च्या वर्ल्ड कपमध्ये त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या. तो वर्ल्डकपचा मालिकावीर ठरला होता. त्याने आपल्या खेळीने चाहत्यांची मनं जिंकली होती. तर गोलंदाजांच्या मनात धडकी भरवली होती. मात्र रक्ताच्या कॅन्सर सारख्या गंभीर आजाराला त्याने कडवी झुंज दिली. त्याने यावेळी आपल्या डॉक्टराचेही आभार मानले आहेत.

– सिक्सर किंग
भारतीय संघातील एकदिवसीय क्रिकेटपटू युवराज सिंग हा सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो. २००७ च्या टि-२० क्रिकेटमध्ये त्याने इंग्लंडविरोधात खेळताना स्टूअर्ट ब्रॉड याच्या षटकात ६ बॉल मध्ये ६ षटकार लगावले होते.

– असा आहे प्रवास

२००० मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण

एकूण ३०४ एकदिवसीय, ४० कसोटी, ५८ टी-२० सामने

उत्कृष्ट कामगिरी – २००७ टी-२० वर्ल्ड कपमध्ये सहा चेंडूवर ६ षटकार

२०११ मध्ये त्याने वर्ल्ड कप जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

आरोग्य विषयक वृत्त –
जुन्या आजारामुळे विम्याचा दावा नाकारता येणार नाही
दिवसभरात ३ कपांपेक्षा जास्त चहा पिऊ नका, ‘हे’ होतील दुष्परिणाम

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like