पण, युवराजसारखे खेळाडू ‘मिळणे’ अत्यंत कठीण : वीरेंद्र सेहवाग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यानं क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती पत्करली आहे. युवराज सिंगच्या निवृत्तीच्या घोषणेवर भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने प्रतिक्रिया दिली आहे. खेळाडू येतील आणि जातील पण युवराजसारखे खेळाडू सापडणे अत्यंत कठीण आहे. असे भावनिक ट्विट वीरेंद्र सेहवाग याने केले आहे.

क्रिकेटचे मैदान गाजवणारा भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग ट्विटरवरही नेहमीच सक्रिय असतो. युवराजच्या निवृत्तीविषयी बोलताना वीरेंद्र सेहवागने ट्विट केले आहे की , ‘खेळाडू येतील आणि जातील. पण युवराजसारखे खेळाडू सापडणे अत्यंत कठीण आहे.

युवराजच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले, पण त्याने गोलंदाज व आजाराला ठोकून काढले आणि चाहत्यांची मनं जिंकली. त्याच्या या झुंजार प्रवासामुळे आणि इच्छाशक्तीमुळे त्याने अनेकांना प्रोत्साहन दिले. युवराज, तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.’ या ट्विटसोबतच त्याने एक फोटोही शेयर केला आहे.

युवराजने ४० कसोटी सामन्यांत ३३. ९२ च्या सरासरीनं १९०० धावा केल्या आहेत . वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३०४ सामने आहेत आणि त्यात त्याने ८७०१ धावा केल्या. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ५८ सामन्यांत ११७७ धावा केल्या आहेत.

सिक्सरकिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवराजने २००७ मधील टी-२० वर्ल्डकपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकाच्या सहाच्या सहा चेंडूंवर षटकार ठोकले आहेत. युवराजने २००७ आणि २०११ च्या वर्ल्डकपमध्ये सामनावीराचा किताब पटकावला होता.

आरोग्य विषयक वृत्त –

स्वाईन फ्लूसाठी नवी औषधे द्या, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राकडे मागणी

अशी घ्या मुलांच्या मौखिक आरोग्याची काळजी

फूड पॉयझनिंगवर ‘हे’ आहेत साधेसोपे रामबाण उपाय

अशुद्ध रक्ताने भेडसावते पिंपल्स आणि थकव्याची समस्या