‘या’ गोष्टीसाठी मी ग्रेग चॅपलला कधीही माफ करणार नाही : योगराज सिंग

मुंबई : वृत्तसंस्था – भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर आता त्याच्या निवृत्तीवरून त्याचे वडील आणि भारताचे माजी खेळाडू योगराज सिंग यांनी भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्यावर निशाणा साधला आहे.

त्यांनी चॅपल यांच्यावर टीका करताना म्हटले आहे कि, भारतीय संघाच्या सराव सत्रात खो-खो खेळात असताना युवराजच्या गुडघ्याला दुखापत झाली. जर हि दुखापत झाली नसती तर युवराजने वन डे आणि ट्वेन्टी – २० सामन्यातील सर्व रेकॉर्ड मोडले असते. मी यासाठी चॅपलला कधीही माफ करणार नाही.

यावेळी बोलताना त्यांनी युवराजच्या लहानपणीच्या गोष्टींना देखील उजाळा दिला. यावेळी ते म्हणाले कि, युवराज दीड वर्षाचा असताना त्याला मी बॅट हातात दिली होती आणि माझ्या आईने त्याला चेंडू टाकला होता, आजदेखील माझ्याकडे तो फोटो आहे. त्यानंतर वयाच्या सहाव्या वर्षी मी त्याला पहिल्यांदा स्टेडियमला घेउन गेलो होतो, ज्याठिकाणी मी सराव करत असे. त्यावेळी मी युवराजला रोज दीडतास धावायला सांगत असे.

दरम्यान, याविषयी बोलताना योगराज भावुक झाले. ते पुढे म्हणाले कि, ४० वर्षांपूर्वी मला संघातून बाहेर काढण्यात आले होते. तेव्हापासून ते दुःख घेऊन मी जगत आलो आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

पोटाचा अल्सर असल्यास आढळतात ‘ही’ १० लक्षणे

‘या’ पाण्याचे आहेत अनेक फायदे ; अशक्तपणा दूर करण्यासह बरच काही

गरोदरपणातील समज-गैरसमज ? जाणून ‘घ्या’ सत्य

यामुळेही वाढू शकतो ‘टाइप-२ डायबिटीस’चा धोका