12 वर्षापुर्वी ‘सिक्सर किंग’ युवराजच्या ‘6,6,6,6,6,6’ मुळं डरबनमध्ये उडाली होती ‘खळबळ’, आज देखील ‘रेकॉर्ड’ कायम (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 19 सप्टेंबर 2007 या दिवशी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह याने इतिहास रचला होता. दक्षिण आफ्रिकेत खेळवल्या गेलेल्या पहिल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवराज सिंहने स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर 6 चेंडूत 6 षटकार मारत वर्ल्ड रेकॉर्ड केला होता.

एकाच षटकात सहा षटकार
भारताच्या डावातील 18 व्या षटकात एंड्रयू फ्लिंटॉफ गोलंदाजी करत होता. मात्र या षटकात युवराज आणि त्याच्यात शाब्दिक लढाई झाली. त्यामुळे भडकलेल्या युवराजने त्याचा राग ब्रॉडवर काढला. त्याने ब्रॉडच्या 19 व्या षटकात सहा चेंडूत सहा षटकार खेचत वर्ल्डरेकॉर्ड केला.

 

12 चेंडूत अर्धशतक : आज देखील रेकॉर्ड
या सामन्यात युवराजने केवळ 12 चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले होते. या सामन्यात युवराजने केवळ 16 चेंडूत 58 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या बळावर भारताने 218 धावा केल्या होत्या. युवराजने या खेळीत 7 षटकार आणि 3चौकार खेचले होते. त्यानंतर भारताने इंग्लडला 18 धावांनी पराभूत केले होते.

युवराजने मला 6 षटकार मारून गोलंदाज बनवले
युवराजने सन्यास घेतल्यानंतर एका मुलाखतीत बोलताना ब्रॉडने सांगितले कि, युवराजने 6 षटकार मारून मला खऱ्या अर्थाने गोलंदाज बनवले. ज्यावेळी हे सहा षटकार मारले त्यावेळी मी 21 वर्षांचा होतो. त्यानंतर मात्र मी अनुभव घेत मोठा गोलंदाज झालो.

दरम्यान, 37 वर्षीय युवराजने याच वर्षी जून महिन्यात क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. त्याने 304 एकदिवसीय सामन्यांत 8701 धावा केल्या होत्या. यामध्ये 14 शतक आणि 52 अर्धशतकांचा समावेश होता. त्याचबरोबर 58 टी-20 सामन्यांत त्याने 1177 धावा केल्या होत्या.

visit : Policenama.com