निवृत्‍तीबद्दल युवराज सिंहनं 4 महिन्यांनी ‘मौन’ सोडलं, BCCI ची ‘पोलखोल’ करत निवड समितीला घेतलं ‘फैलावर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – याच वर्षी जूनमध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या माजी अष्टपैलू युवराज सिंगने क्रिकेटच्या भारतीय निवड समितीच्या भेदभाव करण्याच्या वृत्तीवर तीव्र हल्ला चढविला आहे. युवराज सिंग यांनी एका खासगी टीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की निवडकर्त्यांनी त्याला संघाबाहेर ठेवण्याचा कट रचला होता आणि यो-यो चाचणी उत्तीर्ण होऊनही त्यांनी त्याची संघात निवड केली नाही.
बोर्ड ने की बाहर करने की साजिश, पहले कहा- यो-यो टेस्ट पास करो
युवराज सिंग यांनी निवड समितीवर भेदभावाचा आरोप करत सांगितले आहे की २०१७ मध्ये यो-यो टेस्ट उत्तीर्ण होऊनही त्याचा भारतीय संघाचा समावेश केला नव्हता. २००७ ची टी -२० आणि २०११ मधील एकदिवसीय विश्वचषकात भारताच्या विजेतेपदासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेल्या युवराजसिंगला २०१७ मध्ये वेस्ट इंडिज दौर्‍यानंतर पुन्हा संघात स्थान मिळू शकले नव्हते.
टीम से बाहर रखने के लिए कियो यो-यो टेस्ट का बहाना
बोर्डाने बाहेर काढण्यासाठी रचला कट :
युवराज सिंग यांनी झालेल्या घडामोडींविषयी बोलताना सांगितले, ‘मी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या वेळी मी ८ ते ९ सामने खेळले होते ज्यामध्ये २ वेळा सामनावीरही ठरलो होतो. असे असूनही, मला संघातून वगळले जाईल असा विचार मी कधीच केला नव्हता. युवीने सांगितले की, ‘मी जखमी झाल्यामुळे मला श्रीलंकेच्या दौर्‍याची तयारी करण्यास सांगितले. मग अचानक मला यो-यो चाचणी देण्यास सांगितले. हा माझ्या निवडीत ते यू टर्न होता. अचानक वयाच्या ३६ व्या वर्षी या दौऱ्याऐवजी यो-यो टेस्टची तयारी करावी लागली.
भारतीय खिलाड़ियों को बेइज्जत करने की रही है परंपरा
यो-यो कसोटी म्हणजे संघाबाहेर ठेवण्याचा बहाणा :
वृत्तवाहिनीशी बोलताना युवराज म्हणाला, “मी यो-यो टेस्ट उत्तीर्णही झालो, त्यानंतर मला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितले गेले. माझ्या वयामुळे मी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकणार नाही आणि त्यानंतर, त्यांच्याकडून मला संघाबाहेर ठेवणे सोपे होईल असा कदाचित समितीचा अंदाज असेल. असे म्हणत संघाबाहेर ठेवण्यासाठी कट रचल्याचा आरोप त्याने केला.
जहीर खान, सहवाग के साथ भी यही हुआ
झहीर खान, सेहवागबद्दलही असेच घडले :
युवराज म्हणाला की, मला संघातून वगळता येईल असे कधीही सांगण्यात आले नाही आणि ज्या प्रकारे त्याला संघातून बाहेर ठेवले गेले त्यामुळे मला अत्यंत दुःख झाले. झहीर आणि सेहवागला संघातून वगळल्याच्या पद्धतीबद्दलही त्याने दु: ख व्यक्त केले. तो म्हणाला, ‘माझ्या माहितीनुसार जे खेळाडू १५-१७ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहेत. त्यांच्याबरोबर बसून व्यवस्थित बोललेही जात नाही. माझ्याशी कोणी चर्चा केली नव्हती किंवा वीरेंद्र सेहवाग आणि झहीर खान यांनादेखील याबद्दल काहीही सांगितलेले नव्हते.
आंकड़ों में युवराज सिंह का करियर
भारतीय खेळाडूंचा अपमान करण्याची परंपराच आहे :
युवी म्हणाला, ‘कोणताही खेळाडू, जो कोणी निर्णय घेणार असेल त्याने खेळाडूंसोबत बसून त्यांना सांगावे की आता आम्ही तरुण खेळाडूंकडे लक्ष देत आहोत आणि आम्ही असा असा निर्णय घेतला आहे. असे झाल्यास तुम्हाला सुरुवातीला वाईट वाटेल परंतु कमीतकमी ते तुमच्या तोंडावर खरे म्हणाल्याचे तुम्हाला समाधान वाटेल. मात्र असे भारतीय क्रिकेटमध्ये अजिबात घडत नाही. युवराज सिंग म्हणाले, ‘भारतीय क्रिकेटमध्ये नेहमीच असे घडले आहे. मी हे मोठ्या खेळाडूंबरोबर घडताना पाहिले आहे.’