… तर निवृत्त रद्द करून पुन्हा खेळणार युवराज सिंह ? PCA नं केलं ‘हे’ खास आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाब क्रिकेट असोसिएशन (PCA) ने भारताचा पूर्व खेळाडू युवराज सिंगला खास आवाहन केले आहे. पीसीए ने 38 वर्षीय युवराजला प्रदेश टीम मध्ये खेळण्याचा आग्रह केला आहे. पण अद्यापही युवराजने यावर त्याचा निर्णय सांगितलेला नाही.

पीसीए सचिव पुनीत बाली म्हणाले कि, त्यांनी युवराजला पुन्हा खेळण्यासाठी आग्रह केला आहे. युवराज सध्या शुभमन गिल सोबत युवा खेळाडूंना मार्गदर्शन करत आहे. क्रिकेट “बाएं हात का खेल” असणाऱ्या युवराजने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 40 टेस्ट, 304 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि 58 टी-20 सामने खेळले.

बाली म्हणाले,”आम्ही पाच-सहा दिवसांपूर्वी युवराजशी बोललो आहोत आणि आता त्याच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. जर युवराजने संमती दिली तर पंजाब क्रिकेटसाठी खूप आनंदाची बाब असेल.” युवराजने मागच्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

2019 च्या वर्ल्डकप मध्ये युवराज नव्हता. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय खेळात नव्हता, तो विदेशात लीग मध्ये खेळत होता.