ICC World Cup 2019 : जसप्रित बुमराहच्या जाहिरातीची ‘सिक्सर किंग’ युवराजने ‘टर’ उडवली, इतर खेळाडूंनी दिली ‘मजेदार’ प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि निवृत्ती स्वीकारलेला युवराज सिंग आपल्या हजरजबाबीपणा साठी ओळखला जातो. भारतीय संघात देखील तो नेहमीच मजामस्ती करतं दिसून येत असे. भारतीय संघातील खेळाडूंचे पाय खेचण्यात आणि मस्ती करण्यात तो नेहमीच पुढे असायचा. त्यानंतर आता पुन्हा एकदा तो आपल्या जुन्या अंदाजात दिसून आला आहे. यावेळी त्याने भारतीय संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे पाय खेचले आहेत. बुमराच्या एका इंस्टाग्रामवर पोस्टवर त्याने याविषयी मजा केली आहे.

या पोस्टमध्ये बुमराने एका फेसवॉश कंपनीची जाहिरात केली होती. बुमरा या कंपनीसाठी जाहिरात करण्याचे काम करतो. मात्र युवराज सिंगने या फोटोवरून देखील बुमराची फिरकी घेतली. यावर बुमराने लिहिले होते कि, आपल्या चेहऱ्यावरील डागांपासून सुटका करून घेण्यासाठी फक्त हे करा. यावर युवराज सिंग याने फिरकी घेताना म्हटले कि, हो तुझ्या चेहऱ्यावर खूप डाग आहेत, त्यामुळे तुला याची गरज आहे, तू देखील याचा वापर कर.

त्यावर जसप्रीत बुमराह देखील एक पाऊल पुढे निघाला, त्याने युवराजला चिडवताना त्याच्या वयाचा उल्लेख करताना म्हटले कि, तुला याची जास्त गरज आहे. पुढे तो म्हणाला कि, युवी पा तुला तरुण दिसण्यासाठी या क्रीमची गरज पडणार आहे, लवकरच तुला हे क्रीम मिळेल. त्यामुळे यामध्ये युवराजवर जसप्रीत बुमराह भारी पडल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, या वर्ल्डकपमध्ये बुमरा जबरदस्त फॉर्ममध्ये असून भारतासाठी हुकुमी एक्का ठरत आहे.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

You might also like