‘आज रात्री तुला जेवण कसं मिळतं तेच बघते’, ‘सिक्सर किंग’ युवराजला पत्नीची ‘धमकी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – इडन गार्डन मैदानावर झालेल्या पहिल्या दिवस रात्र कसोटी सामन्यात भारतीय संघानं बाजी मारली. कसोटी मालिकेत भारतानं 2-0 असं वर्चस्व राखत ICC च्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. भारताची वेस्ट इंडिज विरुद्ध क्रिकेट मालिका सुरू होणार आहे. 6 डिसेंबरपासून टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधीच क्रिकेटर्स आपल्या कुटुंबासोब वेळ घालवत आहेत.

दरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहलीनं पत्नी अनुष्कासोबतचे फोटो शेअर केले आहे. दोघांनी सोबत सिनेमाही पाहिला. यानंतर रोहित शर्मानं सोमवारी पत्नी रितिकासोबत एक फोटो शेअर केला आहे. तो फोटो पाहून युवराज सिंगची पत्नी हेझल किच मात्र युवराजवर चागंलीच भडकली आहे. तिनं युवराजला थेट धमकावलंच आहे.

रोहितनं शेअर केलेला रोमँटीक फोटो पाहून युवीची पत्नी हेजल त्याच्यावर प्रचंड चिडली. त्याला म्हणाली, “युवराज तू पण माझ्यासाठी असंच काहीतरी पोस्ट शेअर करायला हवं होतं. परंतु तुझं वागणं पाहून आपल्या लग्नाला 30 वर्ष झाल्यासारखं वाटतंय. आज रात्री तुला जेवण कसं मिळतं तेच बघते.” अशी मजेशीर कमेंट हेजलनं केली आहे.

यानंतर युवराजनंही लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या पत्नी हेजलला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. युवी पोस्टमध्ये म्हणतो, “लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. असं वाटतंय की लग्नाला 30 वर्षे झाली आहेत.”

दरम्यान रोहितनं शेअर केलेल्या फोटोत तो पत्नीचा हात हातात घेऊन भटकंती करत आहे. फोटो शेअर करताना त्यानं म्हटलं की, “मी याआधी आनंदी होतो. परंतु तुझा हात हातात घेतल्यानंतर माझा आनंद द्विगुणित झाला आहे. या पोस्टवर रितिकानंही कमेंट केली की, “Aaawwww babyyyyyyy” याच फोटोनंतर हेजलनं युवीला मजेशीर धमकी दिली.

दरम्यान IPL 2019 नंतर युवीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन निवृत्ती घेतली. IPL 2020 मध्ये कोणता संघ त्याला विकत घेतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like