वर्ल्डकपमध्ये युवराज सिंगच्या नावावर ‘हे’ आहे बॉलिंगचे रेकॉर्ड, चहल ‘ते’ रेकॉर्ड मोडणार ?

लंडन : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. सगळ्याच संघाचे जवळपास तीन सामने झाले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड गुणतालिकेत सध्या सर्वात वरच्या स्थानावर आहे. भारत या वर्ल्डकपमध्ये विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजला जात आहे. भारतीय संघात अनेक धुरंधर खेळाडू आहेत जे भारताला या स्पर्धेत विजेतेपद मिळवून देऊ शकतात.

असाच एक खेळाडू म्हणजे नुकतीच भारतीय संघातून निवृत्ती घेतलेला युवराज सिंह. त्याच्या नावावर वर्ल्डकपमध्ये अनेक विक्रम आहेत. त्याने या स्पर्धेत २ वेळा चारपेक्षा जास्त खेळाडूंना बाद करण्याचा पराक्रम केलं आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेत हा विक्रम मोडण्याची संधी भारताचा युवा लेगस्पिनर युझवेन्द्र चहल याच्याकडे आहे. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांत त्याने विरोधी संघाचे कंबरडे मोडण्याचे काम केले आहे, त्यामुळे चांगल्याच फॉर्ममध्ये असणाऱ्या चहलसाठी हे काम फार अवघड नाही. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चार बळी घेतले होते. पुढच्या सामन्यात जर त्याने चार किंवा जास्त बळी मिळवले तर तो युवराजच्या विक्रमाशी बरोबरी करेल. जर त्याची हि कामगिरी अशीच सुरु राहिली तर तो याच स्पर्धेत युवराजचा विक्रम मोडीत काढेल. युवराजने हा पराक्रम करताना एकदा चार तर दुसऱ्यांदा पाच बळी घेतले होते.

दरम्यान, सर्व सामन्यात देखील चहलने उत्तम गोलंदाजी करत विरोधी संघाला चांगलेच जेरीस आणले होते. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरोधात देखील त्याने चांगली गोलंदाजी केली होती.

सिनेजगत

#Video : कटरीना हिल्स घालून ‘हुस्न परचम’ गाण्यावर लावते ठुमका…

कतरिना कैफने करिअरबाबतीत केला ‘हा’ मोठा खुलासा

अर्जुन कपूरच्या शर्टलेस फोटोला पाहून ‘थक्क’ झाली मलायका, म्हणाली……

#Video : ‘बाहुबली ३’ चित्रपटाचे निर्देशन ‘या’ निर्मात्याने केले पाहिजे : तमन्ना भाटिया