युवराज म्हणतो सगळे मिळवले मात्र ‘या’ एका गोष्टीची राहील आयुष्यभर खंत !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – भारताचा स्फोटक आणि धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग याने आज आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यावेळी त्याने भावुक होत आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीला उजाळा देत अनेक गोष्टींचा उलगडा केला.

एकदिवसीय सामन्यांत तीनशेहून अधिक सामने नावावर असणाऱ्या युवीनं ८७०१ धावा केल्या. युवराजच्या नावावर २००७ चा ट्वेंटी-२०वर्ल्ड कप, २०११ चा एकदिवसीय वर्ल्ड कप आणि १९ वर्षांखालील वर्ल्ड कप आहेत. तीनही वर्ल्डकप जिंकणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे.

२००० मध्ये आंतराष्ट्रीय सामन्यांत पदार्पण करणारा युवराज २०१७ मध्ये शेवटचा सामना खेळला होता. युवराजच्या नावावर ३०८ एकदिवसीय सामने, ४० कसोटी सामने तर ५८ ट्वेन्टी २० सामने आहेत. यावेळी आपल्या कारकिर्दीविषयी बोलताना तो भावुक झाला होता.

यावेळी बोलताना तो म्हणाला कि, कारकिर्दीत सार्व काही मिळले मात्र एक स्वप्न शेवटपर्यंत राहिले आणि त्याची खंत आयुष्यभर राहील. याविषयी बोलताना तो म्हणाला,” १७ वर्षांच्या कारकिर्दीत जास्त कसोटी सामने खेळता न आल्याची खंत नेहमी राहील. आजारपणामुळे कसोटी खेळता आली नव्हती आणि ते माझ्या हातात नव्हतं.”त्यामुळे याची खंत कायम राहील.

दरम्यान, रक्ताचा कर्करोग झालेला असताना देखील त्याने २०११ मध्ये भारतासाठी वर्ल्डकप खेळून भारताला विजय मिळवून दिला होता. तसेच त्या स्पर्धेत तो मालिकावीर देखील ठरला होता.

आरोग्य विषयक वृत्त- 

गर्भपाताची औषधे विकणाऱ्या ऑनलाईन पोर्टलविरोधात एफआरआय

वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्यासाठी अशी सोडवा ‘इरेक्शन’ची समस्या

मालक तणावात असेल तर ‘कुत्रा’देखील असतो तणावात

बोगस पॅथॉलॉजी लॅबकडे महापालिकांचे दुर्लक्ष