PPE सूट घालून नाचली युजवेंद्र चहलची होणारी बायको, Video व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने साखरपुडा केल्यानंतर त्याची होणारी बायको धनश्री वर्माचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. धनश्रीने नुकत्याच केलेल्या एका डान्सचा व्हिडीओ लोकांच्या पसंतीस आला आहे. धनश्री पीपीई सूट घालून एअरपोर्टवरच नाचत असल्याचा व्हिडिओ व्हारयल झाला आहे. ती एका पंजाबी गाण्यावर डान्स करते आहे. पीपीई सूट घालून तिनं कुर्ता पजामा या पंजाबी गाण्यावर ठेका धरला आहे.धनश्रीने एअरपोर्टवरच हा डान्स केला आहे.

धनश्री वर्मा एक यूट्यूबर असून डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. तिची स्वत:ची कंपनीही आहे. धनश्रीने हिपहॉपचे प्रशिक्षणही घेतले आहे. तिच्या यूट्यूब चॅनलला 1.5 मिलिअन सबस्क्रायबर आहे. चॅनेलवर तिने असे बरेच व्हिडीओ याआधी शेअर केले आहेत. दरम्यान, युजवेंद्र चहलने 8 ऑगस्टला सोशल मीडियावर धनश्रीसह साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. कोरोना काळात झालेल्या या छोटेखानी सोहळ्यात या दाम्पत्याचे कुटुंबीय उपस्थित होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like