Lockdown : फारकाळ घरात राहु शकत नाही, लॉ’कडाउन’ला युजवेंद्र चहल कंटाळला

पोलिसनामा ऑनलाईन टीम –   कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. देशभरात सध्या करोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता हा लॉकडाउन आता 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. भारतीय संघाचे क्रिकेटपटूही या काळात घरातच आहेत. मात्र भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आता लॉकडाऊनला कंटाळला आहे. लॉकडाउन संपल्यानंतर किमान 3 वर्ष तरी घरात राहणार नसल्याचे त्याने सांगितले आहे.

लॉकडाउन संपले की मी घरी परतणार नाही. आता मला हे सहन होत नाहीये, मी आता अधिक काळ घरात राहू शकत नाही. सध्या जितका वेळ मी घरात राहतो आहे. त्यामुळे पुढच्या 3 वर्षात मी घराबाहेर राहून सगळे भरुन काढणार आहे. मी जवळच्या हॉटेलमध्ये रहायला जाईन पण घरात राहणार नाही. बस झाले आता मला लॉकडाउन झेपत नाही, असेही चहल म्हणाला आहे. लॉकडाउनच्या काळात चहल सोशल मीडिया आणि टिकटॉक व्हिडीओतून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत आहे. मला सारखे मैदानावर जावसे वाटत आहे, मला गोलंदाजीचा सराव करायचा आहे. सध्या क्रिकेट खेळायला खूप संधी आहे आणि नेमक्या याच वेळेत तुम्हाला घरी बसून रहावे लागत आहे. मी आता जो काही आहे ते क्रिकेटमुळेचत् यामुळे ज्या दिवशी लॉकडाउन संपेल त्यादिवशी मी घराबाहेर जाऊन सरावाला सुरुवात करणार आहे.