पुरंदर तालुक्यातील जि. प. शिक्षकांच्या वेतनास विलंब

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला व्हावे, असा शासन आदेश असतानाही पुरंदर पंचायत समिती प्रशासन मासिक वेतनास सतत विलंब करून आर्थिक कुचंबणा करीत आहे.

जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांच्या काळात पगार नियमित आणि वेळेवर मिळत होते. सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी जिल्हास्तरावरील बैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची पगार पाच तारखेपर्यंत करण्याचे तालुका प्रशासनास निर्देश दिले असतानाही पंचायत समिती शिक्षण विभागाची अनास्था व तालुका प्रशासनाची निष्क्रियता यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून मासिक पगारास विलंब करण्यात धन्यता मानत आहेत.

वास्तविक सण-समारंभाच्या काळात पगार वेळेत व्हावा, असा आग्रह असताना गणपती उत्सव, मोहरम यासारखे सण होऊन गेले, तरी पगार झाले नाहीत. सततच्या पगार विलंबामुळे एलआयसी हप्ता, गृहकर्ज हप्ता, भविष्य निर्वाह निधी हप्ता इत्यादी रकमा वेळेत न गेल्याने परिणामी नाहक भुर्दंड शिक्षकांना सोसावा लागत आहे.

भविष्यात पाच तारखेच्या आत पगार मिळावा, असे लेखी पत्र घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचे राज्य नेते माळवदकर पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात पुरंदर पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी रामदास वालझाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शिक्षकांचे पगार बिले वेळेत तयार करण्यात आलेली होती ; मात्र गटविकास अधिकाऱ्यांची पगार बिलावर सही न झाल्याने पगार लांबले आहेत असे सांगितले आहे .यासंदर्भात गट विकास अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like