अभिनेत्री जायरा वसीमने शेअर केलेल्या पोस्टबाबत तिच्या मॅनेजरचा ‘मोठा’ गौप्यस्फोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुपरहिट सिनेमा दंगल आणि नॅशनल अ‍ॅवार्ड आपल्या नावावर करणाऱ्या जायरा वसीमने काल अ‍ॅक्टींग सोडण्याचा निर्णय घेतला. जायराने मोठी पोस्ट लिहित यामागील कारणाचा खुलासा केला आहे. जायराने लिहिलं आहे की, “५ वर्षांपू्र्वी मी एक असा निर्णय घेतला आहे ज्याने माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. मी भलेही इथे फिट होत असेल परंतु मी इथली नाही. मी माझ्या विश्वासापासून दूर होत आहे.” या पोस्टमध्ये तिने कुराणचाही उल्लेख केला आहे. तिने असेही म्हटले आहे की, हा रस्ता तिला अल्लाहपासून दूर करत आहे.

परंतु याबाबत जायराच्या मॅनेरजरने मीडियाशी बोलताना सांगितले की, जायराचे सगळे सोशल मीडिया अकाऊंट कॉम्प्रोमाईज झाले आहेत आणि तिने ही पोस्ट लिहिली नाही. परंतु एका वृत्तपत्राशी बोलताना जायरा म्हणाली होती की, “सोशल मीडियावर जी पोस्ट आहे ती तिने स्वत: लिहिली आहे.”

image.png

सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये अशी चर्चा आहे की, जायराने ही पोस्ट दबावात येऊन लिहिली आहे. यावर आता वाद होताना दिसत आहे. काही लोक धर्माचे कारण पुढे करत जायराला चुकीचे असल्याचे म्हणत आहेत आणि ट्रोलही होत आहेत. ट्रोलर्सचं असं म्हणणं आहे की, अ‍ॅक्टींग सोडणं हा तिचा स्वत:चा निर्णय असू शकतो. परंतु धर्माचे कारण सांगणे चुकीचे आहे. काही लोक तिच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.

image.png

दंगल सिनेमात जायरा वसीमने आमिर खानच्या मुलीची भूमिका साकारली होती. हा सिनेमा 2016 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमानंतर जायरा सीक्रेट सुपरस्टार सिनेमात दिसली होती. सोनाली बोसच्या द स्काय इज पिंक या सिनेमातही जायरा दिसणार आहे. सिनेमाच्या मेकर्सने तिच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

image.png

काय म्हणाली होती जायरा ?
५ वर्षांपूर्वी मी जो निर्णय घेतला होता त्याने माझे आयुष्य कायमस्वरूपी बदलून गेले. मी बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. यामुळे माझ्यासाठी अपार लोकप्रियतेचे दरवाजे खुले झाले. मला यश मिळत गेलं तरुणांसाठी मी रोल मॉडेल असल्याचं सांगितलं जाऊ लागलं. खरेतर मला हे कधीच बनायचं नव्हतं आणि हे करायचंही नव्हतं. मला क्षेत्रात खूप स्तुती, प्रेम आणि सहकार्य मिळालं आहे परंतु हे मला चुकीच्या रस्त्यावरही घेऊन आलं आहे. माझ्या धर्मासोबत माझे नाते धोक्यात आले. कुराणच्या महान आणि अलौकिक ज्ञानात मला शांती आणि संतोष मिळाला आहे. माझ्या स्वतःच्या विश्वासांवर जोर देण्याऐवजी, मी माझ्या मदतीने आणि मार्गदर्शनाने अल्लाहच्या दयेवर अधिक विश्वास ठेवण्यास सुरुवात केली. मी अधिकृतपणे या क्षेत्रापासून वेगळं होण्याची घोषणा करते.”

आरोग्यविषयक बातम्या

गंभीर आजार होण्यापूर्वी शरीर देते संकेत, वेळीच डॉक्टरकडे जा

शुगर व कोलेस्टेरॉलमुळे होऊ शकतो ‘व्हॅस्क्युलर ट्यूमर’

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील ‘रिलॅक्स’ करणे गरजेचे