दंगल गर्ल झायरा चार वर्षापासून नैराश्येत

मुंबई : वृत्तसंस्था
दंगल, सिक्रेट सुपरस्टार अशा चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री झायरा वसिमने आपण चार वर्षांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचे व त्याचा आपण स्वीकार केल्याचे इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले आहे़

या पोस्टमध्ये झायरा म्हणते, एका मोठ्या काळापासून मला अ‍ॅक्झायटी आणि डिप्रेशनने ग्रासले आहे़ त्याला आता चार वर्षे झाली आहेत़ इतके दिवस ही गोष्ट मान्य करायला मी कचरत होते़ कारण डिप्रेशन या शब्दाकडे पाहण्याचा लोकांचा असलेला नकारात्मक दृष्टीकोऩ त्याच वेळी डिप्रेशन येण्यासाठी तू खूपच लहान आहे़ अथवा ही केवळ तात्पुरती अवस्था असल्याचे सांगितले जायचे़
या पोस्टमध्ये ती म्हणते, दिवसाला अँटिडिप्रेशनच्या पाच गोळ्या, अँक्झायटी अटॅक्स, रात्री-अपरात्री हॉस्पिटलच्या फेºया, रितेपणा, अस्वस्थता, हूरहूर, हॅल्युसिनेशन्स, सूज, अतिझोप किंवा आठवडाभर डोळ्याला डोळा न लागणं, खूप खाणं किंवा भूक उडणं, थकवा, अंगदुखी, स्वत:चा तिटकारा येणं, नर्व्हस ब्रेकडाऊन, आत्महत्येचे विचार… हे सगळं त्या अवस्थेचा भाग होते.

माझ्यासोबत काहीतरी ठीक नाही, हे मला समजत होतं. हे डिप्रेशन आहे, असेही कधी वाटायचे़ वयाच्या बाराव्या वर्षी मला पहिला पॅनिक अटॅक आला होता. चौदाव्या वर्षी दुसरा.. त्यानंतर तर ते मोजणंच बंद केलं. किती औषधं घेतली, याची मोजदादच नाही. कितीवेळा ‘तू डिप्रेशनसाठी खूपच लहान आहेस’ हे सांगितलं गेले, याची गणती नाही. डिप्रेशन असं काही नसतेच असंही मला सांगितलं गेले़

जगभरात ३५० मिलियन व्यक्तींना ज्याने ग्रासलं आहे, ते डिप्रेशन मलाही आल्याचे मान्य करायला मी तयारच नव्हते. ही भावना नाही, हा आजार आहे. मला डिप्रेशनचं निदान होऊन साडेचार वर्ष लोटली. अखेर मी माझे हे रुप स्वीकारायला तयार झाले.

आता मला सगळ्यापासून ब्रेक हवा आहे. माझं काम, सोशल लाईफ, शाळा आणि विशेष म्हणजे सोशल मिडीया. मला आशा आहे की येत्या रमझानच्या पवित्र महिन्यात सकारात्मक बदल घडेल. माज्यासाठी प्रार्थना करा. माज्या भावनिक चढउतारांमध्ये माझी साथ देणाºया सर्वांना मिठी. इतका संयम ठेवल्याबद्दल माझ्या कुटुंबीयांचे विशेष आभार.

झायराने दंगल, सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटांमध्ये आमिर खानसोबत काम केले आहे. झायराला दंगलमधील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही आपल्याला डिप्रेशन आल्याचं सांगितलं होतं. आता १७ वर्षांच्या झायरानेही हे मान्य केलं आहे.

दंगल गर्ल झायरा चार वर्षापासून नैराश्येत

 

A post shared by Zaira Wasim (@zairawasim_) on May 10, 2018 at 2:28pm PDT

Loading...
You might also like