जायरा वसीमसारखे अजिबात नाहीत ‘या’ ‘टॉप’ ४ बालिवूड अभिनेत्रींचे ‘विचार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दंगल आणि सीक्रेट सुपरस्टार यांसारख्या सिनेमातून चर्चेत आलेली अदाकारा जायरा वसीमने बॉलिवूडला अलविदा केलं आहे. फेसबुकवर तिने शेअर केलेल्या एका मोठ्या पोस्टमध्ये ती म्हटली होती की, “धर्म आणि अल्लाहसाठी मी हा निर्णय घेत आहे.” जायरा वसीमचा हा निर्णय बॉलिवूडमध्ये अनेकांना चकित करणारा होता. लोकांचं म्हणणं आहे की, कोणताही धर्म तुम्हाला कलेपासून दूर राहण्यासाठी सांगत नाही. कारण बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे सिनेमात काम करत आहेत आणि नाव कमावत आहेत.

१) सारा अली खान-

सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान आपल्या दोनच सिनेमाने स्टार बनली. सिम्बा आणि केदारनाथ यांसारखे सक्सेसफुल सिनेमे करणाऱ्या साराकडे आज अनेक मोठे सिनेमे आहेत.

sara-ali-khan

२) जरीन खान-
अभिनेत्री जरीन खानने वीर या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. या सिनेमात ती सलमान खान सोबत दिसली होती. यानंतर जरीन आजही सिनेमांमध्ये सक्रिय आहे शिवाय नाव आणि प्रसिद्धी कमावताना दिसत आहे.

ZARIN-KHAN

३) हुमा कुरेशी-
बॉलिवूडची प्रसिद्ध म्हणून हुमा कुरेशी ओळखली जाते. गँग ऑफ वासेपूरमध्ये हुमाने काम केले होते. हुमाचा अभिनय सर्वांनाच आवडला होता. हुमा कोणत्याही मुद्द्यावर बिंधास्तपणे आपले मत मांडत असते. हुमा सध्या नेटफ्लिक्सवरील तिची वेब सीरीज लैलासाठी लोकप्रियता मिळवताना दिसत आहे.

Huma-Kureshi

४) फातिमा सना शेख- 

फातिमा सना शेखनेही दंगल सिनेमात काम केले आहे. याच सिनेमात जायरा वसीम दिसली होती. फातिमा ठग्स ऑफ हिंदोस्तान या सिनेमात शेवटची दिसली होती. फातिमाही आज सिनेमात सक्रिय आहे शिवाय तिच्या अॅक्टींगमध्ये धर्माची बाधा कधीच आली नाही.

Fatima-Sana-Shaikh

सुंदर दिसायचय ? ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा

‘झटपट मेकअप’ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स

किडनी आणि ह्रदय विकारावर द्राक्ष आहेत गुणकारी

वापरायच्या आधी समजून घ्या ‘डे’ आणि ‘नाईट’ क्रीम मधील फरक

आधी एक भुमिका आणि खासदार झाल्यावर एक, इम्तियाज जलीलजी, हे वागणंं बरंं न्हवं !

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

 

Loading...
You might also like