#VideoViral : भर रस्त्यात ‘हे’ करताना दिसली जरीन खान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान सध्या बॉलिवूडपासून दूर असल्याचे दिसत आहे. असे असले तरी जरीन खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. कारण तिला हवं असतं की ती नेहमीच चर्चेत रहावी. गेल्या अनेक दिवसांपासून जरीन आपले फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर करत आहे. नुकताच जरीनने तिच्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जरीन बबल्स बनवताना दिसत आहे. शिवाय तिने या व्हिडीओतून सर्वांचे मन जिंकल्याचे दिसत आहे.

अभिनेता सलमान खानच्या वीर या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी जरीन खान आता पंजाबी सिनेमातही आपली जादू दाखवण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या तिचा बबल्स बनवतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओला जरीनने खास कॅप्शनही दिले आहे. आपल्या कॅप्शनमध्ये जरीन म्हणते की, “जेव्हा तुम्ही खुश असता आणि तुम्हाला माहिती असतं की, बबल्स उडतात.” जरीनने खास आऊटफिटही केला आहे. जरीन व्हाईट टॉप आणि डेनिम जिन्समध्ये दिसत आहे.

तुम्हाला सांगू इच्छितो की, बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस जरीन खानने वीर सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले होते. या सिनेमात ती सलमानसोबत मुख्य भूमिकेत दिसून आली. यानंतर जरीन बॉलिवूडमधील हाऊसफुल 2, रेडी, हेट स्टोरी 3 वजह तुम हो, अक्सर 2 आणि 1921 यांसारख्या सिनेमात काम करताना दिसून आली होती. बॉलिवूडसोबतच जरीन खानने अनेक पंजाबी सिनेमात काम केले आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, लवकरच जरीन डाका या पंजाबी सिनेमात दिसणार आहे.