अभिनेत्री जरीन खानचं वजन होतं १०० किलो ; आता झाली ‘फॅट टू फिट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री जरीन खान सिनेमातील आपल्या बोल्ड सीन्समुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती सिनेमांपासून दूर आहे. बोल्ड सीनव्यतिरीक्त आता आपल्या फिगरमुळे ती चर्चेत आली आहे. दीर्घकाळानंतर जरीन पब्लिकमध्ये स्पॉट झाली आहे. नुकतंच तिला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं आहे.

image.png

यावेळी जरीनने ग्रे टीशर्ट आणि सोबत ब्लॅक जीन्स घातली होती. जरिन खूपच स्टायलिश अंदाजात दिसून आली. मिनिमल मेकअप आणि शेड्सने तिचा लुक परफेक्ट दिसत होता. ओपन हेअरमध्ये जरीन आणखीच सुंदर दिसत होती.

image.png

चाहत्यांना जरीनचा हा लुक खूप आवडला आहे. जरीन स्माईल करत पोज देतानाही दिसत आहे. सध्या जरीनचे हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. तुम्हाला माहिती नसेल परंतु आधी जरीनचं वजन 100 किलो होतं. परंतु आता ती फॅट टू फिट झाली आहे. तिच्या या लुकमुळे सगळे चकित झाले आहेत.

image.png

जरीनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर तिने 2010 साली आपल्या करिअरला सुरुवात केली होती. वीर या सिनेमातून तिने डेब्यू केला होता. यानंतर जरीन बॉलिवूडमधील हाऊसफुल 2, रेडी, हेट स्टोरी 3 वजह तुम हो, अक्सर 2 आणि 1921 यांसारख्या सिनेमात काम करताना दिसून आली होती. बॉलिवूडसोबतच जरीन खानने अनेक पंजाबी सिनेमात काम केले आहे. लवकरच जरीन ढाका या पंजाबी सिनेमात दिसणार आहे. याशिवाय जरी सलमान खानचा रिअॅलिटी शो बिग बॉस 13 मध्ये दिसली आहे.

image.png

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा