Zeal Education Society | झील शिक्षण संस्थेच्या संभाजी काटकर, चंद्रकांत कुलकर्णी, युवराज भंडारी यांना पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Zeal Education Society | 4 कोटी 92 लाख रुपयांची फसवणूक (Fraud Case) केल्याप्रकरणी झील एज्युकेशन संस्थेच्या (Zeal Education Society) संस्थापक अध्यक्ष संभाजी काटकर (Sambhaji Katkar) यांच्यासह तिघांना आर्थिक गुन्हे शाखेने (Pune Police Economic Offences Wing) अटक (Arrest) केली. यानंतर त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली होती. मात्र गुन्ह्याची तपासाची व्याप्ती पाहता आर्थिक गुन्हे शाखेने सत्र न्यायालयात (Shivaji Nagar Sessions Court) याला आव्हान दिले. यावेळी झालेल्या युक्तिवादानंतर सत्र न्यायालयाने प्रथमवर्ग न्यायालयाला गुन्ह्याची (Pune Crime) व्याप्ती जाणवली नसल्याचे नमूद करत अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच.आर. वाघमारे (Judge H.R. Waghmare) यांनी तिघांनाही 7 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली.

 

संभाजी मारुती काटकर Sambhaji Maruti Katkar (वय-65 रा. राजमहल, हिंगणे खुर्द Hingane Khurd), चंद्रकांत नारायण कुलकर्णी Chandrakant Narayan Kulkarni (वय-58 रा. अशोका आगम, दत्तनगर, कात्रज Katraj), युवराज विठ्ठल भंडारी Yuvraj Vitthal Bhandari (वय-35 रा. जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द Ambegaon Khurd) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर योगेश सुभाष ढगे (Yogesh Subhash Dhage) याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

 

संभाजी काटकर हा झील शिक्षण संस्थेचा (Zeal Education Society) अध्यक्ष आहे. चंद्रकांत कुलकर्णी हा झील पॉलिटेक्निक कॉलेजचा (Zeal Polytechnic College) तत्कालीन प्राचार्य (Principal), तर भंडारी हा लेखापरीक्षक (Auditor) आहे. ढगे हा संस्थेचा कार्यालयीन अधीक्षक (Office Superintendent) म्हणून काम करत होता. या चारजणांनी संगनमत करुन हा गुन्हा केला आहे. ढगे याने काम सोडल्यानंतर संस्थेने त्याचे पैसे थकवल्याने त्याने संस्थेविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) तक्रार केली होती. त्यावेळी काटकर व त्याचा साथिदारांनी ढगेविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केल्यानंतर ढगेला अटक करण्यात आली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरु असताना त्यांनी केलेला आर्थिक गैरव्यवहार पुढे आला.

झील पॉलिटेक्निक कॉलेजच्या (Zeal Polytechnic College) 2015-16 या वर्षीचा शुल्क मंजुरीसाठीचा प्रस्ताव (Proposal) शासनाकडे पाठवला होता. या प्रस्तावामध्ये प्रत्यक्षात 147 जण नोकरीवर (Job) असताना संशयित आरोपींनी संगनमत करुन माजी विद्यार्थी व संस्थेतील कर्मचाऱ्यांचे असे एकूण 191 कर्मचारी नोकरी करत असल्याची खोटी कागदपत्रे (Fake Documents) सादर केली. त्याद्वारे खोटी पगार पत्रके (Fake Salary Sheets) तयार करुन खर्चाच्या रकमेत जादा खर्च झाल्याचे दाखवून तो प्रस्ताव शुल्क मंजुरीसाठी शासनाच्या शुल्क निर्धारण समितीकडे पाठवून पैसे मंजूर करुन शासनाची फसवणूक केली. नोकरी केली नसतानाही नोकरी केल्याचे दाखविल्यासंदर्भात विद्यार्थ्यांकडे चौकशी करण्यात आली. त्यांनी कधीही झिल संस्थेत नोकरी केली नसल्याचे म्हटले आहे.

 

यामुळे सत्र न्यायालयात आव्हान
प्रथमवर्ग न्यायालयाच्या आदेशाला आर्थिक गुन्हे शाखेने सत्र न्यायालयात आव्हान दिले. अतिरिक्त सरकारी वकीलांनी बाजू मांडताना झील पॉलिटेक्निक कॉलेजच्या 2015-16 च्या शुल्क नियामक प्रधिकरणाकडे सादर केलेल्या प्रस्तवात वार्षिक लेखा परिक्षण अहवालामध्ये वेतनावरील खर्च 8 कोटी 72 लाख रुपये दर्शविला असल्याचे सांगितले. मात्र, लेखा परिक्षकाने त्याचे दि. 19 ऑक्टोबर 2017 मध्ये दिलेल्या पत्रावरुन 2015-16 मधील वेतनावरील खर्च 4 कोटी 25 लाख 29 हजार इतका आहे. म्हणजे 4 कोटी 46 लाख रुपये जास्त दाखवल्याचे समोर आल्याने सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले.

आणखी तपास गरजेचा
या रकमेचा विनीयोग कोठे केला, याचा तपास करण्यासाठी नोकरीस नसताना नोकरीस असल्याचे दाखिवले गेले,
याची बनावट प्रमाणपत्रे (Fake Certificates) कोठे बनवली गेली, याचाही तपास करायचा आहे.
पगार पत्रकांवर बनावट स्टाफ व विद्यार्थी यांना स्टँम्प लावून पगार दिल्याचे दाखविले आहे.
झिल एज्युकेशनच्या इतर शैक्षणिक संस्थांमध्येही वेतन या सदराखाली वाढीव रक्कम दाखवून
त्या आधारे विद्यार्थ्यांची पालकांकडून व शासनाकडून फी घेतली असण्याची शक्यता असल्याने तपास करायचा आहे.
याचे मुख्य सुत्रधार कोण आहेत? याचा तपास करायचा आहे.
त्यामुळे तिघांना सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी अ‍ॅड. कावेडीया (Adv Rajesh Kavediya) यांनी केली.
त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन तिघांना पोलीस कोठडी सुनावली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर (Police Inspector Dattatraya Bhapkar) करीत आहेत.

 

Web Title :- Zeal Education Society | Police custody of Sambhaji Katkar, Chandrakant Kulkarni and Yuvraj Bhandari of Zeal Education Society in Fraud case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corporation | ‘रिन’ काढून ‘सण’; महापालिका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर ! मोठ्या योजनांचा भार भविष्यात पुणेकरांच्या ‘खिशा’वर

 

Diabetes Control | डायबिटीजच्या रूग्णांसाठी परिणामकारक आहे कच्ची हळद, जाणून घ्या कशी

 

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! सासरच्या जाचाला कंटाळून संरक्षण दलातील कर्मचाऱ्याची आत्महत्या