Zeal Education Society | झील शिक्षण संस्थेच्या संभाजी काटकर, चंद्रकांत कुलकर्णी आणि युवराज भंडारीचा जामीन फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Zeal Education Society | बोगस कर्मचाऱ्यांची माहिती राज्य सरकारकडे (State Government) सादर करुन विद्यार्थ्यांकडून जादा शुल्क आकारत सव्वाचार कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार (Financial Fraud) केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या (Crimes Branch) पथकाने मंगळवारी (दि.25) पुण्यातील (Pune Crime) नऱ्हे येथील झील शिक्षण संस्थेच्या (Zeal Education Society) संस्थापकासह तिघांना अटक (Arrest) केली. अटक करण्यात आलेल्या तिघांनी न्यायालयात जामीन अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तिघांचा जामीन अर्ज फेटाळला (Bail Application Rejected). त्यामुळे त्यांना तपासासाठी पोलीस कोठडीत ठेवण्यासाठी पोलिसांनी सत्र न्यायालयात (Sessions Court) अपील केले असून यावर सोमवारी (दि.31) सुनावणी होणार आहे.

 

संभाजी मारुती काटकर Sambhaji Maruti Katkar (वय-65 रा. राजमहल, हिंगणे खुर्द Hingane Khurd), चंद्रकांत नारायण कुलकर्णी Chandrakant Narayan Kulkarni (वय-58 रा. अशोका आगम, दत्तनगर, कात्रज Katraj), युवराज विठ्ठल भंडारी Yuvraj Vitthal Bhandari (वय-35 रा. जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द Ambegaon Khurd) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Zeal Education Society)

 

संभाजी काटकर हा झील शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. चंद्रकांत कुलकर्णी हा झील पॉलिटेक्निक कॉलेजचा (Zeal Polytechnic College) तत्कालीन प्राचार्य (Principal), तर भंडारी हा लेखापरीक्षक (Auditor) आहे. ढगे हा संस्थेचा कार्यालयीन अधीक्षक (Office Superintendent) म्हणून काम करत होता. या चारजणांनी संगनमत करुन हा गुन्हा केला आहे. ढगे याने काम सोडल्यानंतर संस्थेने त्याचे पैसे थकवल्याने त्याने संस्थेविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) तक्रार केली होती. त्यावेळी काटकर व त्याचा साथिदारांनी ढगेविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केल्यानंतर ढगेला अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांनी केलेला आर्थिक गैरव्यवहार पुढे आल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर (Senior Police Inspector Dattatraya Bhapkar) यांनी दिली.

झील पॉलिटेक्निक कॉलेजच्या 2015-16 या वर्षीचा शुल्क मंजुरीसाठीचा प्रस्ताव (Proposal) शासनाकडे पाठवला होता.
या प्रस्तावामध्ये प्रत्यक्षात 147 जण नोकरीवर (Job) असताना संशयित आरोपींनी संगनमत करुन माजी विद्यार्थी व संस्थेतील कर्मचाऱ्यांचे
असे एकूण 191 कर्मचारी नोकरी करत असल्याची खोटी कागदपत्रे (Fake Documents) सादर केली.
त्याद्वारे खोटी पगार पत्रके (Fake Salary Sheets) तयार करुन खर्चाच्या रकमेत जादा खर्च झाल्याचे दाखवून
तो प्रस्ताव शुल्क मंजुरीसाठी शासनाच्या शुल्क निर्धारण समितीकडे पाठवून पैसे मंजूर करुन शासनाची फसवणूक केली.

 

तसेच विद्यार्थ्यांकडून ठरावीक रक्कम शुल्कापोटी घेणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात त्यांनी विद्यार्थ्यांकडून नियमापेक्षा जास्त शुल्क आकारून विद्यार्थी,
पालक यांचीही फसवणूक केली. झील शिक्षण संस्थेअंतर्गत असलेल्या झील पॉलिटेक्निक कॉलेजच्या 2015-16 या शैक्षणिक वर्षात
अशा विद्यार्थ्यांचे पालक व राज्य सरकारकडून जादा शुल्क आकारणी करुन 4 कोटी 25 लाख 29 हजार 482 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले.

संस्थेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार
साहयक पोलीस आयुक विजयकुमार पळसुले (ACP Vijay Kumar Palsule) यांनी सांगितले की,
झील शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालय (College of Engineering), व्यवस्थापन महाविद्यालय (College of Management),
एमसीए कॉलेज (MCA College) या शैक्षणिक संस्थांमध्येही मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरु आहे. आर्थिक व सायबर गुन्हे शाखेची पथके तपास करीत आहेत.

 

Web Title :- Zeal Education Society | Sambhaji Katkar, Chandrakant Kulkarni and Yuvraj Bhandari’s bail rejected

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | राजस्थानातील अनेक गावात ‘सेक्सटॉर्शन’चा झालाय धंदा, पुणे पोलिसांच्या तपासात धक्कादायक प्रकार समोर

 

Nia Sharma – Madhuri Dixit | माधुरी दीक्षितच्या ‘चोली के पीछे क्या है’ गाण्यावर निया शर्मानं मारले जबरदस्त ठुमके, व्हिडिओ पाहून चाहते झाले घायाळ

 

Rakhi Sawant LipLock | फोटोग्राफरच्या सांगण्यावरून राखीनं चक्क कॅमेरासमोरच केलं पती रितेश सोबत LipLock

 

Urfi Javed Crying Video | हॉटेलमध्ये मुलासोबत असताना ढसा-ढसा रडली उर्फी जावेद, जाणून घ्या काय आहे कारण…

 

Cervical Cancer Symptoms And Precautions | प्रत्येक महिलेला आवश्य माहिती असावे काय आहे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव