‘स्वराज्य रक्षक संभाजी’च्या चाहत्यांसाठी खुशखबर ! TRP रेसमध्ये ‘या’ क्रमांकावर मालिका, जाणून घ्या

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर आहे. एका रिपोर्टनुसार, येत्या आठवड्यात स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेत अमोल कोल्हेंनी छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारत उभ्या महाराष्ट्राला आपल्या अभिनयाने वेड लावले आहे. शिवाय या मालिकेची कथा तर भारदस्त आहेच परंतु या मालिकेतील सर्व पात्रांनी आपल्या भूमिकेला योग्य तो न्याय दिला आहे त्यामुळे या मालिकेचा प्रेक्षकवर्ग प्रचंड मोठ्या संख्येत आहे.

या रिपोर्टनुसार पूर्वी अव्वल स्थानी असलेली मालिका म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही होती. अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि अनिता दाते यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचा प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि महाराष्ट्र भर प्रत्येकाच्या घरात ही मालिका पहिली जाते. परंतु गेल्या काही आठवड्यांपासून ही मालिका दुसऱ्या स्थानी स्थित असून पहिल्या क्रमांकावर ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका आहे. काही आठवड्यांपूर्वी ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका देखील अव्वल स्थानावर होती. त्यातील राणा दादा आणि पाठक बाई यांची भूमिका चांगलीच चर्चेत होती पण आता ही मालिका खूप मागे पडली असून टिआरपीच्या रेसमध्ये पहिल्या पाच मालिकांमध्ये देखील या मालिकेचा समावेश नाहीये.

रिपोर्टनुसार, अजून एक कार्यक्रम हा नेहमी चर्चेत असतो तो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. सध्या चला हवा येऊ द्या हा सेलिब्रेटी पॅटर्न कार्यक्रम तिसऱ्या क्रमांकावर आहे. या कार्यक्रमाला देखील मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ही मालिका पहिल्या पाच मध्ये आपले स्थान टिकवून आहे.

या बड्या मालिकांनंतर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर नुकत्याच सुरु झालेल्या ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायको’ आणि ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेंचा समावेश होतो. ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायको’ या मालिकेने चौथ्या क्रमांकावर बाजी मारली असून निवेदिता सराफ, तेजश्री प्रधान, गिरिश ओक आणि रवी पटवर्धन यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘अग्गंबाई सासूबाई’ चा पाचवा क्रमांक लागतो. या मालिकेचा देखील एक मोठा प्रेक्षक वर्ग महाराष्ट्रात आहे.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like