नव्या वर्षात तुमचा मोबाईल नंबर बदलणार ! Landline वरुन कॉल करण्यासाठीचा TRAI चा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ग्राहकांना आता देशभरात लँडलाईनवरुन मोबाईल फोनवर कॉल करण्यासाठी एक जानेवारीपासून मोबाईल नंबरच्या आधी शून्य लावणे बंधनकारक असणार आहे. दूरसंचार विभागाने या संबंधातील ट्रायच्या या प्रस्तावाचा स्वीकार केला आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथाॅरिटी ऑफ इंडिया म्हणजे ट्राय या प्रकारच्या कॉल साठी २९ मे २०२० पासून नंबर आधी शून्य लावण्यास सांगितला आहे. दूरसंचार विभागाने २० नोव्हेंबर रोजी एक परिपत्रकात जारी केलं त्यात म्हटलं आहे, की लँडलाईनवरुन मोबाईलवर फोन डायल करण्याच्या पद्धतीत आता बदल करण्याच्या ट्रायचा सल्ला स्वीकारला आहे. मोबाईल नंबरच्या आधी शून्य लावावा लागले. दूरसंचार विभागाने म्हटलं आहे, की आता सर्व ग्राहकांना शून्यडायल करण्याची सुविधा द्यावी लागले.

ही सुविधा आपल्या क्षेत्राहून बाहेर कॉल करण्यासाठी उपलब्ध आहे. दूरसंचार कंपन्यांनी या नव्या व्यवस्थेला आत्मसात करण्यासाठी एक जानेवारीपर्यंत वेळ दिला आहे. डायल करण्याच्या या पद्धतीत बदल केल्यामुळे दूरसंचार कंपन्यांना मोबाईल सेवेसाठी २५४. ४ कोटी अधिक नवे नंबर बनवणे सुविधा उपलब्ध होईल, यामुळे भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी याचा फायदा होईल.

You might also like