खुशखबर ! 1 सप्टेंबरपासुन ‘झिरो बॅलन्स’च्या खातेदारांना ‘या’ 5 सुविधा मिळणार ‘एकदम’ FREE, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशभरातील करोडो झिरो बॅलन्स खातेदारांना भारतीय रिजर्व बँक (आरबीआय) ने एक सप्टेंबर पासून काही नवीन सुविधा देण्याची घोषणा केली आहे. आरबीआय ने बेसिक बचत खातेदारांसाठी नवी नियमावली लागू केली असून तिचे पालन आता सहकारी बँकांना देखील करावे लागणार आहे. हे खाते कोणत्याही बँकेत उघडता येवू शकते.

या नव्या सुविधा मिळणार :
१. झिरो बॅलन्स खातेदारक आता बँकेच्या शाखेशिवाय एटीएम आणि कॅश डिपॉजिट मशीन मध्येदेखील पैसे जमा करू शकणार आहेत.
२. या खात्यांमध्ये फंड ट्रांसफर किंवा युपीआय च्या मदतीने देखील पैसे जमा करता येवू शकणार आहे. महिन्यात कितीही वेळा पैसे जमा करता येणार.
३. हे खातेदार महिन्यातून चारवेळा एटीएमद्वारे पैसे काढू शकतील.
४. या सर्व खात्यांना रुपे डेबिट कार्ड मिळेल.
५. हवे असल्यास हे खातेदार चेकबुक ची देखील मागणी करू शकतात.

आत्तापर्यंत या झिरो बॅलन्स खातेदारांसाठी चेकबूक किंवा अन्य सुविधा हव्या असल्यास त्यांचे खाते सर्वसाधारण बचत खात्यात परावर्तित होत असे मात्र आता असे होणार नसून झिरो बॅलन्स खात्यातच या सुविधा संपूर्णपणे मोफत दिल्या जाणार आहेत.

नवी सुविधांसाठी कसलेही शुल्क आकारले जाणार नाही :आरबीआय ने सांगितल्याप्रमाणे १ सप्टेंबर पासून मिळणाऱ्या नवीन सुविधांसाठी झिरो बॅलन्स खातेदारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. झिरो बॅलन्स खाते ते सर्व नागरिक उघडू शकतात ज्यांना आपल्या बँक खात्यात कोणत्याही प्रकारच्या मिनिमम बॅलन्स ची  सक्ती नको आहे आणि ते महिन्यात केवळ चारच ट्रांजेक्शन करतात.