बाप रे !  रिलीजनंतर काही तासांतच शाहरुख खानचा ‘झिरो’ ऑनलाईन लीक

मुंबई : वृत्तसंस्था – आजच शाहरुख खानचा ‘झिरो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट रिलीज होऊन काही तासच झाले असतील परंतु लगेचच एक धक्कादायक बाब समोर आली आहे की,  ‘झिरो’ ऑनलाईन लीक झाला आहे. ‘झिरो’चे काही सीन्स फेक ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले गेलेत. आनंद एल राय यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या घटनेमुळे  ‘झिरो’च्या मेकर्सला धक्का बसला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राज बन्सल नामक एका ट्विटर हँडवरून ‘झिरो’च्या सीन्सची एक व्हिडिओ क्लिपही शेअर झाली आहे.  मनोज बाजपेयी नामक एका ट्विटर अकाऊंटनेही ‘झिरो’चे सीन्स लीक केले आहेत. गिरीश जौहर, अनुपमा चोप्रा, राजीव मसंद, कोमल मेहता, राहुल राऊत या ट्रेड अ‍ॅनालिस्टच्या नावांच्या फेक अकाऊंटवरूनही ‘झिरो’ लीक करण्यात आला आहे. आत्तापर्यंत तमिलरॉकर्स वा टोरेंट फ्री डाऊनलोड साईट्सवरून चित्रपट लीक झाल्याचे समोर आले होते. पंरतु फेक ट्विटर हँडलवरून चित्रपटाचे सीन्स प्रथमच लीक झाल्याचे समजत आहे. यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहतीनुसार, ‘झिरो’च्या मेकर्सकडून याबाबत अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ते नेमके काय कारवाई करतील या कडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान या चित्रपटात शाहरुख खान, कॅटरिना कैफ व अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया लवकरच पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांना शाहरूखचा अंदाज किती भावतो हेही लवकरच समजेल. ‘झिरो’ या चित्रपटात कॅटरिना कैफ बबीता कुमारीची भूमिका साकारते आहे.अनुष्का शर्माही यात  महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. तर  शाहरुख खान एका बुटक्या व्यक्तिच्या भूमिकेत आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट २०० कोटींच्या घरात असल्याचे समजत आहे. या चित्रपटात शून्यापासून सुरू केलेला त्याचा प्रवास यात दिसणार आहे.