Zero Rupee Note In India | झीरो रुपयाची नोट छापण्याची भारतात का भासली होती गरज? जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Zero Rupee Note In India | तुम्ही आतापर्यंत भारतात अनेक प्रकारच्या नोटा पाहिल्या असतील. 1 रुपयाची नोट, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये इत्यादी अनेक चलनी नोटा भारतात चालतात (Currency Notes in India). काही वर्षांपूर्वीपर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाही चलनात होत्या, मात्र नोटाबंदी (Demonetisation) नंतर त्या बंद झाल्या. (Zero Rupee Note In India)

 

या सर्व नोटांव्यतिरिक्त, तुम्ही कधीही शून्य रुपयांची नोट (Zero Rupee Note) पाहिली आहे का? अर्थात, ज्या नोटेची किंमत नाही, तिची गरजच काय, यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटणे सहाजिक आहे. आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे 0 रुपयांची नोट (0 Rupee Note in India) भारतातच छापण्यात आली होती.

 

भारतात भ्रष्टाचाराचे (Zero Rupee Note to Fight Corruption) मुळ खूप जुने आहे. अनेक क्षेत्रात वेगवेगळ्या स्तरावर काही लोक आहेत जे चुकीच्या मार्गाने सर्वसामान्य जनतेचा पैसा लुबाडण्याचा प्रयत्न करतात. असे लोक लाच घेण्यावरही विश्वास ठेवतात. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी 0 रुपयांची (Why 0 Rupee Notes Printed in India?) नोट भारतात छापण्यात आली, पण या नोटा रिझर्व्ह बँकेने छापल्या नाहीत.

कोणी छापल्या होत्या नोटा?
खरं तर, 2007 मध्ये, भारतातील तानाडुतील एक एनजीओ फिफ्थ पिलरने (Fifth Pillar NGO in India) शून्य रुपयांच्या नोटा छापल्या होत्या आणि त्या सार्वजनिकपणे वितरित केल्या होत्या.

 

या स्वयंसेवी संस्थांने हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये सुमारे 5 लाख नोटा वितरित केल्या
होत्या आणि त्या बसस्थानक, रेल्वे स्थानक, विमानतळ, बाजारपेठ अशा ठिकाणी लोकांना वाटल्या होत्या,
जेणेकरून त्यांना कधी कुण लाच मागितली तर तिच नोट द्यावी. याद्वारे त्यांना लोकांना जागरूक करायचे होते.

 

अशी दिसत होती शून्य रुपयाची नोट
शून्य रुपयांच्या नोटेवर एनजीओचे नाव लिहिले होते. आणि त्यावर छापण्यात आले होते –
प्रत्येक स्तरातून भ्रष्टाचार संपवा. इतर नोटांप्रमाणेच या नोटेवरही महात्मा गांधींचे चित्र होते.
तर मागच्या बाजूला अधिकार्‍यांचे क्रमांक लिहिलेले होते.

 

लोकांना सांगण्यात आले होते की जेव्हा कोणी लाच मागेल तेव्हा त्यांना हिच नोट द्यावी.
त्या नोटेवर लिहिले होते- लाच न घेण्याची शपथ घेवूयात आणि लाच न देण्याची शपथ घेवूयात.
या नोटा बराच काळ लोकांकडे होत्या.

 

 

Web Title :- Zero Rupee Note In India | viral why zero rupee note printed in india who printed 0 rupee currency note

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Crime News | पोलीस वसाहतीमध्ये गृहरक्षक तरुणीने घेतले जाळून

7th Pay Commission Update | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये क्रेडिट होतील 2 लाख रुपये, 18 महिन्याच्या DA एरियर बाबत मोठे अपडेट

CP Amitabh Gupta | आज रात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती (व्हिडिओ)