×
Homeआर्थिकZerodha Nithin Kamath | 'पैशांच्यामागे पळू नका, ‘या’ ठिकाणी गुंतवणूक करा' -...

Zerodha Nithin Kamath | ‘पैशांच्यामागे पळू नका, ‘या’ ठिकाणी गुंतवणूक करा’ – झिरोदाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामत

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – पैसा हा साठवून नाहीतर गुंतवूण वाढतो. त्यासाठी योग्य गुंतवणूक (Investment) करणे आवश्य आहे. या योग्य गुंतवणुकीसाठी झिरोदाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामत (Zerodha Nithin Kamath) यांनी काही क्लृपत्या सांगितल्या आहेत. तरुण वयापासूनच गुंतवणूक केल्यास त्याचा पुढील आयुष्यात मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे तरुणांनी गुंतवणुकीकडे जास्त प्रमाणात वळले पाहिजे, असे नितीन कामत (Zerodha Nithin Kamath) म्हणाले.

तरुणांकडे या वयात जास्त पैसा नसतो. पण लहान वयात पॉकेटमनीतून पैसे वाचवून त्यांनी गुंतवणूक केली पाहिजे. सुरुवातीच्या काळात तरुणांनी केवळ बचत आणि गुंतवणूक केली पाहिजे. महागड्या वस्तू वापरुन आयुष्य सुधारत नाही, तर कमी किंमतीच्या वस्तू वापरुन सुद्धा आयुष्य काढता येऊ शकते. त्यामुळे उज्वल भविष्यासाठी जास्तीत जास्त पैसा वाचवून तो गुंतवणुकीत घाला. तसेच हे सर्व करताना कर्ज घेणे टाळावे, असे देखील कामत यांनी आवर्जुन सांगितले.

कोणत्याही नव्या क्षेत्राची उत्सुकता हे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कौशल्य आहे. जे एखाद्या तरुणाला कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम करण्यासाठी विकसित करणे आवश्यक आहे. अनेक लोक पैशांवर जास्त भर देऊन मोठी चूक करतात. केवळ इक्विटी (Equity Shares) आणि म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक करण्याचा आग्रह कोणीही धरू नका. स्वतःमध्ये गुंतवणूक करा. कौशल्य विकासावर भर द्या. तसेच तुमच्या अनुभवांमध्ये गुंतवणूक करा, असेही कामत (Zerodha Nithin Kamath) म्हणाले.

नितीन कामत भारतातील सुप्रसिद्ध स्टॉक ब्रोकिंग हाऊस झिरोदाचे (Zerodha) संस्थापक आहेत.
त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षात या क्षेत्रात पाऊल ठेवले आणि गुंतवणुकीचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली.
कामत यांनी वयाच्या 17 वर्षात स्टॉक मार्केटमध्ये (Stock Market) गुंतवणूक केली आणि 21 व्या वर्षी
त्यांनी मोठी रक्कम जमा देखील केली. त्यांच्यामते त्यांना मिळालेल्या वाईट अनुभवांमुळे ते सर्वात जास्त शिकले.
मार्केटमधील मंदी सर्वात जास्त अनुभव आणि अभ्यास देते असे त्यांचे मत आहे.
त्यामुळे त्यांनी तरुणांना पैसा आणि सुख चैनीच्या वस्तूंच्यामागे न पळता, अभ्यास आणि अनुभवांच्या
मागे पळण्याचे आवाहन केले आहे. तसेच आयुष्यात सर्वात मोठी गुंतवणूक पैसा नसून शिक्षण आणि उत्सुक्ता आहे,
असे देखील त्यांनी सांगितले.

Web Title :-  Zerodha Nithin Kamath | ‘Don’t run after money, invest in ‘this’ place’ – Zeroda Founder & CEO Nitin Kamat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jitendra Awhad | ‘असल्या आरोपांतून घरे उद्धवस्त होतील, त्यापेक्षा राजकारणात न राहिलेले बरे’ – जितेंद्र आव्हाड

Salaam Venky Movie| ‘सलाम वेंकी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलिज , अभिनय आणि संवाद जिंकतील तुमचे मन

Haryanvi Dancer Gori Nagori | हरियाणवी डान्सर गोरी नागोरीच्या ‘या’ गाण्यावरील डान्स पाहुन चाहते झाले घायाळ, सोशल मिडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल (VIDEO)

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News