Zika Virus | अलर्ट! पुण्यासह राज्यात आढळले झिकाचे ५ रुग्ण; सर्व जिल्हाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – झिका व्हायरसचा (Zika Virus) संसर्ग वाढत असल्याने आरोग्य विभागाने (Health Department) सर्व जिल्हाधिकाऱ्यांसाठी महत्वाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. ऑक्टोबरपासून राज्यात झिकाचे ५ रुग्ण सापडल्याने चिंता व्यक्त होत आहे. झिकाचे (Zika Virus) इचलकरंजीत २, पुणे १, कोल्हापूर १ आणि पंढरपूर येथे १ अशा ५ रुग्णांची नोंद झाली आहे.

देशात झिकाचा संसर्ग वाढत असून कर्नाटकमध्ये हे प्रमाण जास्त आहे. राज्यात झिकाचे रूग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे.

आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे की, झिकाचा ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार घ्या. सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार मोफत आहेत. झिकाची लागण झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही. झिकामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण खुप कमी आहे. झिकाची लक्षणे सहसा सौम्य असतात. झिकाची (Zika Virus) लागण झालेल्या ५ पैकी फक्त १ व्यक्तीमध्ये लक्षणे दिसतात.

झिकाची लक्षणे

  • ताप
  • त्वचेवर लाल ठिपके
  • सांधेदुखी
  • डोळेलाल होणे

झिकाची लक्षणे साधारणपणे २-३ दिवसांपासून आठवडाभर टिकतात. राष्ट्रीय रोग निदान संस्था नवी दिल्ली, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे येथे झिकाच्या निदानाची सुविधा आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Thackeray On Amit Shah | अमित शाहांच्या ‘त्या’ वक्तव्याचा दोन्ही ठाकरे बंधूंनी घेतला समाचार, राज ठाकरेंनी सुनावले

Pune Pimpri Crime News | घरगुती कारणावरुन वयस्कर आईचा खून, मुलाला अटक; देहूरोड परिसरातील घटना

‘आमच्या सोबत का फिरत नाही?’ म्हणत दोन तरुणांना मारहाण, आंबेगाव मधील घटना

Loksabha Election 2024 | कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवार कोण? मातोश्रीवर इच्छूकांची बैठक, हातकणंगलेत राजू शेट्टींना पाठिंबा?