Zika Virus | पुण्यात झिका संसर्गाचा धोका; 4 महिने गर्भधारणा टाळण्याचा तज्ज्ञांकडून सल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग आटोक्यात येत असतानाच झिका विषाणूने डोकं वर काढलं आहे. या झिका विषाणूचा (Zika virus) धोका पुण्यात दिसून येत आहे. झिकाचा संसर्ग (Zika Virus) झाल्यावरती त्यापासून अधिक धोका हा गरोदर महिला आणि नवजात बाळाला होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. अशी शक्यता वैद्यकीय विभागाच्यावतीने व्यक्त केल्यानंतर पुरंदर (Purandar) तालुक्यातील बेलसर (Belsar Pune) गावात कमीतकमी 4 महिने महिलांनी गर्भधारणा टाळण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकारी (Medical officer) आणि प्रशासनाने (administration) दिलाय.

पुणे (Pune) जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातल्या बेलसर (belsar pune) गावात राज्यातील झिकाचा (Zika virus) पहिला रुग्ण आढळून आला. यावरुन राज्य आणि केंद्र प्रशासनाने धावपळ करून विविध वैद्यकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन येथील परिस्थितीशी पाहणी केलीय. त्यानंतर झिका संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न देखील केला गेल्याने याला यश आले आहे. दरम्यान, झिकाचा संसर्ग हा दूषित एडीस डास चावल्याने होतो. रक्ताच्या देवाण घेवाणीतून अथवा स्त्री-पुरूष संबंधातून झिकाचा संसर्ग होतो. झिकाचा संसर्ग झाल्यावर काही वेळेस काही लक्षणे दिसत नाहीत मात्र, पुरुषांच्या वीर्यात साधारणत: 4 महिने झिकाचा विषाणू जीवंत राहू शकतो. त्यामुळे अशा पुरूषापांसुन झालेली गर्भधारणा झिका संसर्ग ग्रस्त असू शकते. यामुळे किमान तीन महिने गर्भ धारणा टाळावी. असं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे.

तसेच, ‘पुरुषांनी शक्यतो संभोग टाळावा अथवा सुरक्षित संभोग करावा असे वैद्यकीय विभागाचे म्हणणे आहे. यासाठी येथील आरोग्य विभागाकडून गर्भधारणा टाळण्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या दरम्यान, ‘झिका संसर्गातून झालेल्या गर्भधारणेतून गर्भवती महिलेच्या जन्मलेल्या बाळाच्या मेंदूची पूर्ण वाढ होत नाही, डोक्याचा आकार कमी होतो, वेळेच्या आधी संबधित महिला बाळंत होवू शकते, तसेच उपजत बाळाचा मृत्यू देखील होवू शकतो.असं तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला जाधव (Medical Officer Dr. Ujwala Jadhav) म्हणाल्या.

बेलसर गावचे उपसरपंच धीरज जगताप (Dheeraj Jagtap) यांनी म्हटले आहे की, ‘केंद्र आणि राज्य सरकार कडून मिळालेल्या सुचनेनुसार येथे ग्रामपंचायत व बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यावतीने डासांची उत्पत्तीचे ठिकाणे नष्ट केलीय. तसेच, गावात जनजागृतीसाठी भोंगा गाडीचा वापर करून दारोदारी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. गावात सर्व ठिकाणी फवारणी केली, गावातल्या २४ गरोदर महिलांना मच्छरदाणी आणि डास प्रतिबंधक मलम देण्यात आला, या महिलांचे रक्ताचे नमुने तपासले आहे. अशी माहिती त्यांनी दिलीय.

बेलसर प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भरत शितोळे (Medical Officer Dr. Bharat Shitole) म्हणाले की,
‘सध्या बेलसर येथे डेंगू, चिकनगुनियाचे पेशंट कमी झाले आहेत तर ज्या महिलेला झिकाचा संसर्ग झाला होता.
त्या महिलेचे NIV संस्थेकडून पुन्हा रक्ताचे तपासण्यात आले याचा रिपोर्ट आला असुन तिचे डेंगू,
चिकनगुनिया व झिका असे तीनही अहवाल निगेटिव्ह आले आहेत
तर गावात एकही नवीन झिका सदृश रुग्ण निदर्शनास नाही’ अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Web Title :-  Zika Virus | advice to avoid conceive pregnancy 4 months due to risk of infection zika in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Sadan Scam | भुजबळांच्या दोषमुक्ततेला ‘लाचलुचपत’चा विरोध, ACB चा न्यायालयात युक्तीवाद

Rain in Maharashtra | राज्यात ‘या’ तारखेपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार

Milind Narvekar | ‘मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ED आणि CBI लावू’; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या स्वीय सहायकास धमकी