Zika Virus | पुण्यातील 79 गावांत झिकाचा प्रादुर्भाव झाल्याची शंका; प्रशासन अलर्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचे संकट अजूनही कमी झाले नसताना आता पुणे जिल्ह्यात (Pune) झिका व्हायरसचा (Zika Virus) पहिला रुग्ण पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे आढळून आला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने 79 गावांमध्ये झिका व्हायरसचा (Zika Virus) प्रार्दुभाव झाला असल्याची शंका व्यक्त करत त्या गावाची यादी प्रसिद्ध केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासन अलर्ट (District Administration Alert) झाले असून जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी 10 कलमी कार्यक्रम जारी केला आहे. तर आरोग्य विभागाने या गावात आपत्कालीन सुविधांसाठी तयारी केली आहे.

गेल्या महिन्याभरात पुरंदरमधील (Purandar) बेलसर येथे तापाचे रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे त्या गावातील 41 जणांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (National Institute of Virology) येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 25 जणांना चिकनगुनिया तर 3 जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून बेलसर एका 50 वर्षीय महिलेस झिका विषाणूची बाधा झाल्याचा निष्कर्ष 30 जुलै रोजी प्रयोगशाळेने दिला होता. या घटनेनंतर राज्यातील आरोग्य विभाग सतर्क झालं.

Pune Crime | पुण्यात कौटुंबिक वादातून डॉक्टर पतीचा डॉक्टर पत्नीवर चाकू हल्ला; विश्रांतवाडी परिसरात खळबळ

पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली. त्यानंतर सर्व ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाला अलर्ट करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी झिका संक्रमणाच्या दृष्टीकोनातून अतिसंवेदनशील 79 गावांची यादी प्रसिद्ध केली. ज्या गावांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून वारंवार डेंग्यू (Dengue) आणि चिकनगुनिया (Chikungunya) आजारानं प्रभावित आहेत. ती गाव झिका व्हायरसच्या संक्रमणासाठी अतिसंवेदनशील आहेत. असे देशमुख यांनी सांगितले.

डेंग्यू आणि चिकनगुनियासारखा आजार 79 गावांमध्ये आढळला तर झिका व्हायरसच्या दृष्टीने ते संवेदनशील मानले जाईल. या 79 गावांमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाचा रुग्ण आढळला तर त्याच्या रक्ताचे नमुने घेतले जातील. त्या रुग्णांचे झिका संक्रमणाची चाचणी होईल. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी 10 कलमी कार्यक्रम जारी केला असून अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. हा अधिकारी झिकाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करणार आहे.

झिका व्हायरस कसा पसरतो?

एडीज मच्छरांमुळे (Aedes mosquito) झिका व्हायरस पसरतो. हे मच्छर डेंग्यू आणि चिकनगुनिया पसरवतात. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात या मच्छरांची संख्या अधिक असून झिकाचे संक्रमणास हे मच्छर जबाबदार आहेत. त्यामुळे झिका संक्रमणापासून वाचण्यासाठी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणं गरजेचे आहे.

काय आहेत प्रशासनाच्या सूचना?

डेंग्यू, चिकनगुनिया सारखे लक्षण कोणत्याही व्यक्तीमध्ये आढळले तर तात्काळ त्याची तपासणी
केली जाईल. ज्या जागांवर एडीज मच्छरांची उत्पत्ती होईल अशाठिकाणी स्वच्छतेवर विशेष लक्ष
देण्याची सूचना आहे. त्याचसोबत जलाशयाच्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात यावेत जेणेकरून
मच्छरांवर नियंत्रण आणण्यात येईल.

हे देखील वाचा

PMSBY | फक्त 1 रुपया दरमहिना खर्च करा आणि मिळवा 2 लाखाचे ‘कव्हर’, ‘या’ पध्दतीनं करू शकता रजिस्ट्रेशन; जाणून घ्या

LPG Connection | आता देशभरात एका नंबरवर कॉल करताच मिळेल LPG कनेक्शन, मिस्ड कॉल करून मिळवा सिलेंडर, जाणून घ्या प्रोसेस

Amit Shah | अमित शहांनी चंद्रकांत पाटील यांची भेट टाळली?


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Zika Virus | another crisis maharashtra after corona due zika virus pune district administration alert

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update