Zika Virus | पुणे जिल्ह्यातील ‘झिका’ची अतिसंवेदनशील 79 गावांची जाहीर, वाचा लिस्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही तोपर्यंत झिकाचे (Zika Virus) नवे संकट समोर आले आहे. जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील (Purandar taluka) बेलसर (Belser) येथे झिकाचा (Zika Virus) पहिला रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी झिकाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 10 कलमी कार्यक्रमही आखला आहे. त्यानंतर आता जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी जिल्ह्यातील 79 गावे झिका संसर्गाबाबत अतिसंवेदनशील (Hypersensitive) म्हणून जाहीर केली आहेत.

यामध्ये हवेली तालुक्यातील (Haveli taluka) सर्वाधिक गावांचा समावेश आहे तर सर्वात कमी आंबेगाव तालुक्यातील (Ambegaon taluka) एका गावाचा समावेश आहे. मागील तीन वर्षांत सातत्याने या गावांमध्ये डेंग्यू (Dengue) व चिकुनगुनिया (Chikungunya) या आजारांचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे ही गावे झिका संसर्गाबाबत अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यानी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

तालुकानिहाय अतिसंवेदनशील गावे पुढीलप्रमाणे

पुरंदर : सासवड, ढुमेवाडी, पारगाव, नीरा, सुपे खुर्द, बेलसर, जेजुरी.

हवेली : देहू, नांदेड., नऱ्हे, कोंढवे-धावडे, उत्तमनगर, शिवणे, खानापूर, मणेरवाडी, खेड, वाघोली, कोळवडी, मांजरी बुद्रुक, केशवनगर, उरुळीकांचन, शिंदवणे, कोरेगाव मूळ, खामगाव टेक, पिंपरी सांडस, थेऊर.

इंदापूर : निमगाव केतकी, शेळगाव, यादववाडी, कुरवली, माळवाडी, तक्रारवाडी, भादलवाडी.

बारामती : तरडोली, सुपा, काळखैरेवाडी, मोरगाव, सटवाजीनगर, अंबराई, आनंदनगर, तांदूळवाडी, माळेगाव विद्यानगर, सूर्यनगरी, कटफळ.

खेड : राजगुरुनगर शहर, पांडूरंगनगर, शिरोली, आळंदी, मरकळ, भोसे, निघोजे, मोई, मेदनकरवाडी, गोसासी.

दौंड : दौंड शहर, समतानगर, होलारवस्ती, कुरकुंभ, हिंगणी बेर्डी.

जुन्नर : आनंदवाडी, ओतूर, येणेरे, राजुरी, पिंपळवंडी, काळदरी.

वेल्हे : करंजावणे, खामगाव क्षेत्र, ओसाडे, साखर, आंत्रोली.

शिरूर : वढू बुद्रूक, मांडवगणफराटा, गारमाळ, सादलगाव.

भोर : भुतोंडे, चिखलावडे, वाठार.

मुळशी : माण, सूस.

आंबेगाव : घोडेगाव.

हे देखील वाचा

Pune Fire | पुण्याच्या उत्तमनगरमधील ‘थिनर’च्या साठ्याला भीषण आग; दोघे भाडेकरु जखमी, 2 लक्झरी बसगाड्या जळून खाक (व्हिडीओ)

Pune Crime | ‘पतंजली’च्या नावावर सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचा नवा फंडा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Zika Virus | zika virus most vulnerable villages in pune district declared by pune Collector Dr. Rajesh Deshmukh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update