Zilla Parishad Recruitment | जिल्हा परिषदांमधील 13 हजार 514 पदांची भरती प्रक्रिया रद्द, 20 लाख तरुणांना धक्का

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा परिषदांमधील 13 हजार 514 रिक्त पदांची भरती प्रक्रिया (Zilla Parishad Recruitment) रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतला आहे. यामुळे राज्यातील 20 लाख तरुणांमध्ये संताप व्यक्त होत आहे. भरती प्रक्रियेला विलंब आणि आरक्षणाच्या (Reservation) गोंधळामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे कारण पुढे केले असले तरी भरती प्रक्रियेची (Zilla Parishad Recruitment) माहिती ग्रामविकास विभागाकडून गहाळ झाल्याने हा निर्णय घेतल्याचे समजते.
जिल्हा परिषदेतील गट ’क’ मधील 18 संवर्गातील 13 हजार 514 पदांसाठी (Zilla Parishad Recruitment) महापरीक्षा वेबसाइटवर (E-MahaPariksha Portal) 20 लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते. परंतु, महापरीक्षा वेबसाइटवरील गोंधळामुळे ते बंद केले.
यानंतर ग्रामविकास विभागाने (Rural Development Department) नव्याने पत्रक काढून जिल्हा परिषदेच्या भरतीचे काम न्यास कंपनीला दिले.
या कंपनीकडे आरोग्य विभागातील भरतीचे काम सुरू असताना भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला.
त्यानंतर तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आरोग्य भरती रद्द केली होती.
मात्र, जिल्हा परिषदेतील 13 हजार पदांची सर्व माहिती न्यास कंपनीकडे देण्यात आली होती.
त्यानंतर ग्रामविकास विभागाने मे 2022 मध्ये सर्व जिल्हा परिषदांनी भरतीसाठी गरजेची असलेली माहिती
कंपनीकडून गोळा करावी, अशा सचूना करत आपली जबाबदारी झटकली.
जिल्हा परिषदांमधील पदभरतीसाठी उमेदवारांनी अर्ज पोटी भरलेले परीक्षा शुल्क जिल्हा परिषदा परत करणार आहेत.
शुल्क कशा पद्धतीने परत करायचे याबाबत जिल्हा परिषदांना स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे.
Web Title :- Zilla Parishad Recruitment | the decision of the state government to cancel the recruitment process of 13 thousand 514 posts in zilla parishads
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Shivsena MLA Anil Parab | ‘साई रिसॉर्ट पाडणे आहे’ बांधकाम विभागाची वर्तमानपत्रात टेंडरसाठी जाहिरात