‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ सिनेमात ‘हृतिक-अभय’ऐवजी ‘या’ कलाकारांची झाली होती निवड !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   हृतिक रोशन, अभय देओल, फरहान अख्तर, कॅटरीना कैफ स्टारर जिंदगी ना मिलेगी दोबारा हा सिनेमा रिलीज होऊन 9 वर्षे झाली आहेत. आजही चाहते आनंदानं हा सिनेमा पाहतात. सुरुवातीला निर्मात्यांनी हृतिक आणि अभय ऐवजी दुसऱ्या कलाकारांची निवड केली होती हे तुम्हाला माहिती आहे का.

अनेकांना माहिती नसेल परंतु या सिनेमासाठी आधी इम्रान खान आणि रणबीर कपूरची निवड झाली होती. कारण त्यावेळी रणबीर आणि इम्रान दोघंही फेमस अॅक्टर होते. परंतु काही कारणामुळं दोघांनीही सिनेमाला नकार दिला होता. फरहान अख्तरला आधीच या सिनेमासाठी निवडण्यात आलं होतं. त्यानं सिनेमातील डायलॉग लिहिले होते. म्हणून त्याची निवड करण्यात आली होती.

अभय देओलनं हनीमून ट्रॅव्हल्स प्रायवेट लिमिटेड या सिनेमात जोया अख्तरसोबत काम केलं होतं. त्यामुळं त्याची निवड केल्याचं बोललं जात आहे. कॅटरीनाच्या रोलसाठीही अनेक अॅक्ट्रेसला विचारण्यात आलं होतं. परंतु अखेर कॅटरीना कैफची निवड करण्यात आली.

जिंदगी ना मिलेगी दोबारा या सिनेमाचं डायरेक्शन जोया अख्तरनं केलं आहे. शंकर एहसान लॉयनं या सिनेमाला म्युझिक दिलं आहे. हा सिनेमा खूप चालला होता. यानं तुफान कमाई केली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like