Valentine’s Week : ‘या’ 2 राशींचे लोक बनतात सर्वात खराब ‘कपल’, कधीच पटत नाही एकमेकांशी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेकदा एखाद्या पुरुष किंवा महिलेशी भेट झाल्यानंतर तुम्हाला अनुभव आला असेल की तुम्ही एकमेकांना समजून घेत आहात. तुमचे विचार, आवड, राहाणीमान सर्व काही एकमेकांसारखे आहे. त्यामुळे अनेकदा असे वाटून जाते की आपण एकमेकांसाठीच बनलो आहोत.

परंतु अनेकदा काही कारणाने नात्यात तणाव, वाद होतात. एकीकडे काही राशी एकमेकांकडे आकर्षित होतात तर दुसरीकडे काही राशी एकमेकांच्या विरुद्ध असतात. ज्योतिषीच्या मते काही अशा राशी आहेत जे चांगले जोडीदार (कपल) होऊ शकत नाहीत.

मकर आणि मेष रास –
चांगल्या विचाराचे आणि चांगले राहाणीमान असलेल्या मकर राशीच्या लोकांचे मनाचे करणाऱ्या आणि कायम उतावळे असलेल्या मेष राशीच्या लोकांशी अजिबात जमत नाही. मेष राशीच्या नियंत्रणात ठेवण्याच्या स्वाभावामुळे मकर राशीचे लोक त्रस्त होतात आणि तणावात असतात. मकर राशीच्या कमी वेगाने काम करण्याचा स्वभावामुळे मेष राशीच्या लोकांशी त्यांच्याशी ताळमेळ बनवण्यास समस्या येते.

कुंभ आणि वृषभ रास –
ऊर्जावान आणि स्वतंत्र विचाराचे कुंभ राशीच्या लोकांचे हट्टी आणि दृढ स्वभाव असलेल्या वृषभ राशीच्या लोकांशी अपापसात वाद होतात. यांच्यात विचारात एकता नसते. हे दोन्ही राशीचे लोक जोडीदार म्हणून एकत्र राहायला लागतात तेव्हा धन, घर, भविष्यातील योजनामुळे प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींवरुन वाद होतात.

मीन आणि मिथुन रास –
कलात्मक आणि सहज मीन राशीच्या लोकांना आपल्या मिथून राशीच्या जोडीदाराला समजून घेण्यास बऱ्याच अडचणी येतात. मीन राशीचे लोक दुसऱ्यांच्या गरजा, इच्छा आणि भावनांची अत्यंत काळजी घेतात. तर मिथुन राशीचे लोक बोलतात एक आणि करतात एक. मिथुन राशीचे लोक कायम एक प्रकारच्या समस्येत असल्याचे दिसते ज्यामुळे मीन राशीचे लोक त्यांना समजू शकत नाहीत.

मेष आणि कर्क रास –
दृढनिश्चयी मेष राशीचे लोक जेव्हा सौम्य राशीच्या लोकांच्या संगतीत जातात तेव्हा त्यांना अडचणी येतात. कर्क राशीचे लोक दुसऱ्यांची काळजी घेणारे आणि विनम्र स्वभावाचे असतात. परंतु मेष राशीचे लोक एकदम विरुद्ध स्वभावाचे असतात. त्यामुळे या दोघात अडचणी येऊ शकतात. मेष राशीचे लोक मोहक स्वभावाचे असतात तर कर्क राशीचे लोक अंतर्मुखी स्वभावाचे असतात.

वृषभ आणि सिंह रास –
या दोन्ही राशीचे लोक अत्यंत हट्टी स्वभावाचे असतात. सिंह राशीवाले आत्मकेंद्रीत असतात ज्यामुळे ते सहज स्वभावाच्या वृषभ राशीच्या लोकांशी जुळवून घेऊ शकत नाही. सिंह राशीच्या लोकांना लाइमलाइटमध्ये राहणे आवडते त वृषभ राशीचे लोक आपल्याच जगात राहणं पसंत करतात. ज्यामुळे दोघात अनेकदा वाद होतात.

मिथुन आणि कन्या रास –
उत्साही आणि जिज्ञासू स्वभावाचे मिथुन राशीचे लोक आवश्यकतेपेक्षा जास्त प्रॅक्टिकल असतात तर कन्या राशीचे लोक त्यांना बोरिंग वाटतात. मिथुन राशीचे लोक मौजमस्ती आणि प्रेम करण्यावर विश्वास ठेवतात. तर कन्या राशीचे लोकांची पहिली प्राथमिकता त्यांचे काम असते. मिथुन राशीचे लोक न घाबरता प्रेम करतात तर कन्या राशीचे लोक या बाबतीत अत्यंत संकोची असतात. या कारणाने दोघांत ताळमेळ राहत नाही.

कर्क आणि तुळ रास –
कर्क राशीचे लोक प्रामाणिक, स्थिरता, उदारवादी आणि संवेदनशील म्हणुन ओळखले जातात, तर तुळ राशीचे लोक दिखाऊपणा करणाऱ्या स्वभावाचे असतात. हे दोघांत जमत नाही. या दोन्ही राशींना धैर्याने काम घ्यावे लागते. परंतु यावर नियंत्रण न ठेवल्यास नाती खराब होतात.

धनु आणि मीन रास –
धनु राशीचे लोक वातावरण आनंदाचे बनवण्यात तरबेज असतात आणि मीन राशीचे लोक आपल्याच जगात वावरत असतात. मीन राशीचे लोक अत्यंत भावनिक असतात, त्यामुळे त्यांना समजणे धनु राशीच्या लोकांसाठी कठीण असते.

सिंह आणि वृश्चिक रास –
मजा मस्करी करणाऱ्या सिंह राशीच्या लोकांच्या हट्टी स्वभावाशी मिळून घेऊ शकत नाही. सिंह राशीच्या लोकांच्या नेतृत्व करण्याच्या क्षमतेमुळे ओळखले जातात परंतु याच कारणाने ते वृश्चिक राशीच्या लोकांच्या निशाण्यावर असतात. दोघांत अनेकदा वाद होतात.

कन्या आणि धनु रास –
कन्या राशीचे लोक कोणतेही काम योग्य पद्धतीने करतात आणि दुसऱ्यांकडून देखील अशीच अपेक्षा ठेवतात. यामुळे स्वतंत्र विचाराचे धनु राशीचे लोक आपल्या जीवनात ही अडचण सहन करत नाहीत. त्यांना कन्या राशीच्या लोकांसोबत राहणे म्हणजे आपल्यावर दबाव टाकल्यासारखे वाटते, त्यामुळे नात्यात दूरावा येतो.

तुळ आणि मकर रास –
तुळ राशीचे लोक स्वतंत्र विचाराचे असतात तर मकर राशीचे लोक आपल्या चांगल्या विचारासाठी ओळखले जातात. अनेकदा मकर राशीचे लोक कठोर स्वभावाचे होतात त्यामुळे त्यांच्यात वाद होतो.

वृश्चिक आणि कुंभ रास –
या राशीचे लोक एकमेकांच्या एकदम विरुद्ध असतात. या दोघांच्या नात्यात प्रेम आणि प्रमाणिकपणाची कमतरता असते. त्यांच्यात एखाद्या निर्णयावर एकमत होत नाही. त्यामुळे त्यांचे अजिबात पटत नाही.