अक्षरश: T- शर्ट जाळून Zomato च्या कर्मचार्यांनी दिला राजीनामा, जाणून घ्या प्रकरण
कोलकाता : वृत्तसंस्था – लोकांना खाद्यपदार्थ पुरवणार्या कर्मचार्यांनी झोमॅटोचे टी-शर्ट जाळून सामूहिक राजीनामा दिला आहे. लडाखच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनची मुजोरी वाढत आहे. लडाखमध्ये भारत-चीन सीमेवरील तणाव कमी होत नाही. त्यातच चीन वेगवेगळ्या खेळी करत असल्याचे दिसून आले आहे .
लडाखमध्ये सुरू असणार्या कुरापतींच्या निषेधार्थ कोलकाता इथे टी-शर्ट जाळून झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयनी सामूहिक राजीनामा दिला आहे. झोमॅटोमध्ये चीनची गुंतवणूक आहे त्यामुळे यावर बंदी घालण्यासाठी झोमाटोच्या माध्यमातून लोकांना ऑर्डर देऊ नये असे आवाहन यावेळी कर्मचार्यांनी केले आहे. झोमॅटोच्या 150 डिलिव्हरी बॉयनी सामूहिक राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे. 2018 मध्ये चिनी कंपनी अलिबाबाशी संबंधित असलेल्या अँट फायनान्शिय कंपनीने झोमॅटोमध्ये 21 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करुन झोमाटोमध्ये 14.7 टक्के समभाग (शेअर्स) खरेदी केले. झोमाटोने नुकताच अँट फायनान्शियलकडून 15 कोटी डॉलर्स जमा केले.
या नदर्शनात सामील झालेल्यांपैकी एकाने सांगितले,चिनी कंपन्या येथून नफा कमवत आहेत आणि आमच्या सैन्यावर हल्ला करीत आहेत. त्यांना आमची जमीन हडप करायची आहे. आम्ही असे होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा यावेळी झोमॅटोच्या कर्मचार्यांनी घेतला आहे.