Zomato बॉयनं चोरला ‘मलायका आरोरा’चा घटस्फोट करणाऱ्या वकीलाचा ‘कुत्रा’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमच्याकडे एखादा पाळीव प्राणी असेल, तर हे साहाजिक आहे की तुम्हाला त्याचा जिव्हाळा असतो, परंतू कधी त्या पाळीव प्राण्याला किडनॅप केले तर. सेलिब्रिटी वकील वंदना शाह, ज्यांनी अरबाज खान आणि मलायका आरोराचा घटस्फोट करुन दिला होता. त्यांच्या कुत्र्याला झोमॅटो डिलिवरी बॉयने किडनॅप केले. ज्यामुळे त्या रात्रभर झोपू शकल्या नाहीत. काही दिवसात किडनॅपरचा तपास लागला.

वंदनाने सांगितले की, या कुत्र्याला झोमॅटो डिलिवरी बॉय तुषारने किडनॅप केले होते. त्यानंतर 2 – 3 दिवस शोध घेण्यात आला. त्याने आपला फोन बंद केला होता. आम्ही आमच्या भागातील डिलिवरी बॉईजला विचारणा केली, एका डिलिवरी बॉयने सांगितले की त्यांने माझ्या कुत्र्यासह त्या डिलिवरी बॉयला पाहिले होते. त्या डिलिवरी बॉयने जवळपास 2 दिवस आपला मोबाइल बंद ठेवला होता.

त्या म्हणाल्या की मला एक लोकल डिलिवरी बॉय भेटला. त्यानंतर त्याने स्वीकार केले की तो कुत्र्याला घेऊन गेला आहे आणि त्याला 30 हजाराला विकणार आहे. आम्ही त्याला सांगितले की आम्ही तुला काहीही करुन तुरुंगात पाठवू. त्यानंतर तो घाबरला आणि कुत्रा परत करण्यास तयार झाला. कुत्रा परत करताना तो समोर आला नाही, त्याने माझ्या कुत्र्याला माझ्या घरापासून 60 किमी दूर अंतरावर सोडले.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like