नेटफ्लिक्स, अमेझॉनला टक्कर देण्यासाठी झोमॅटोकडून Video स्ट्रीमिंग सेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजच्या इंटरनेटच्या युगात लोकांकडे विविध मनोरंजनाची साधने उपलब्ध आहेत. विविध कंपन्या ऑनलाईन मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे सध्या नागरिकांकडे मनोरंजनाची काहीही कमी नाही. नेटफ्लिक्स, अमेझॉन, हॉटस्टार, सोनी लिव्ह सारख्या ऑनलाईन साधनांद्वारे तुम्ही तुमचे मनोरंजन करू शकता.

https://twitter.com/ZomatoIN/status/1172398075366666242

या मात्र आता बाजारात पुन्हा एक नवीन ऑनलाईन ऍप्लिकेशन येत असून ऑनलाईन खाद्य सेवा देणारी झोमॅटो हि सेवा सुरु करणार आहे. झोमॅटोने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून यामध्ये संजीव कपूर आणि अन्य कलाकार खाद्यपदार्थांविषयी चर्चा करताना दिसून येत आहे. तसेच त्याच्या खाली लिहिले कि, आता आम्हीसुद्धा व्हिडीओ बनवणार. झोमॅटोने आपल्या या नवीन योजनेला ‘झोमॅटो ओरिजिनल्स’ असे नाव दिले आहे.

सध्या हे गुगल प्ले स्टोअरवर आले नसून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या असलेल्या आपल्याला ते अपडेट करणार असून यामध्येच व्हिडिओचा पर्याय देखील देणार आहेत. 18 व्हिडीओ या सेक्शनमध्ये दिले जाणार आहेत. प्रत्येक व्हिडीओ हा साधारण 3 ते 15 मिनिटांचा असणार आहे. त्याचबरोबर जवळपास 2 हजार व्हिडीओ तयार करण्याची योजना झोमॅटोने तयार केल्याची देखील माहिती मिळत आहे.

दरम्यान, खाण्याची आवड असणाऱ्या नागरिकांचा विचार करून झोमॅटो हि व्हिडिओची कल्पना सुरु करत आहे. सर्व व्हिडीओ हे खाद्यपदार्थांविषयीच असणार आहेत. मात्र विविध विषयांवर हे व्हिडीओ असणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –