पुण्यात ‘झोमॅटो’ची ‘डिलेव्हरी फ्री’ न दिल्यानं युवकास ‘जबर’ मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ ‘व्हायरल’

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – झोमॅटोवरून जेवण मागवले. डिलिव्हरी बॉय डिलिव्हरीसाठी गेला. मात्र त्याला चार ते पाच तरुणांनी ऑर्डर कॅन्सल करण्यास सांगितले. परंतु त्याने तसे करण्यास नकार दिल्यावर फुकट दे नाही तर काहीही कर असं म्हटल्याने डिलिव्हरी बॉय निघाला. मात्र त्याचा पाठलाग करून टोळक्याने नळ स्टॉप य़ेथील चौकाजवळ गाठून लाकडी दांडके आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

प्रविण चंद्रकांत कदम असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

रविवारी भारत पाकिस्तान क्रिकेट सामना होता. त्यावेळी अनेकांनी घरातून वेगेवगळ्या फुड डिलिव्हरी अॅपच्या माध्यमातून जेवण मागवले. प्रविण हा झोमॅटोसाठी डिलिव्हरीचे काम करतो. दरम्यान रात्री त्याच्याकडे एक ऑर्डर डिलिव्हरी करण्याचे काम होते. तो ऑर्डरप्रमाणे जेवण डिलिव्हरीसाठी कोथरुडमध्ये गेला. त्यावेळी तेथे ऑर्डर करणाऱ्यांनी त्याला ऑर्डर कॅन्सल करण्यास सांगितले.

त्यावेळी त्याने ऑर्डर कॅन्सल करता येणार नाही असे सांगितल्यावर त्यांनी त्याला जेवण फुकटात दे नाहीतर काहीही कर असे सांगितले. त्यानंतर तो परत जाण्यासाठी निघाला तेव्हा चार ते पाच जणांनी पाठलाग केला आणि त्याला नळ स्टॉपजवळ अडवून लाकडी दांडके, काठ्यांनी जबर मारहाण केली. यात तरुणाच्या डोक्याला जबर मार लागला आहे. तसेच नाकाचं हाड मोडलं. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त